इकळीमाळ येथे भिंतीवर काढलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना : अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मागच्या काही वर्षापासून वादग्रस्त ठरलेल्या तालुक्यातील इकळीमाळ येथे काही समाजकंटकांनी शाळेच्या भिंतीवर काढलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी अज्ञात समाजकंटकांच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

इकळीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी सजावट करण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, शाहिर अण्णाभाऊ साठे, डॉ बाबासाहेब आंबेडकर अनेक महापुरुषांच्या फोटो काढण्यात आल्या होत्या. मात्र काही अज्ञात समाजकंटकांनी लोकशाहीर आन्नाभाऊ साठे, व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो विद्रूप करुन अवमानकारक मजकूर लिहीला.
सदरचा प्रकार दि. 29 रोजी सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती सकाळी उघडकीस आल्यानंतर तहसीलदार धमप्रिया गायकवाड, विभागीय पोलीस अधिकारी बिलोली घटनास्थळी भेट दिली तर कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी पोलीस ताफा घेऊन गावात हजर झाले.
महापुरुषांच्या प्रतिमेच्या विटंबना प्रकरणी बुधवारी सायंकाळी इकळीमाळचे पोलीस पाटील भिमराव जमनाजी जोंधळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर कुंटूर पोलीस स्टेशन मधे गु/र/न/243/2025 कलम 299 बि एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अगोदरच्या काही घटनामुळे इकळीमाळ हे गाव वादग्रस्त ठरुन चर्चेत आले होते मात्र या घटनेमुळे तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी पोलिसांनी बारीक नजर ठेवलेली आहे.



