नायगाव पंचायत समितीतल्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर कार्यवाही मात्र कायम कर्मचारी, अधिकाऱ्यांचे काय..??

भगवान शेवाळे
बरबडा :- नायगावचे आमदार राजेश पवार यांनी प्रशासनातील शिस्तभंगाविरुद्ध थेट पावले उचलत नागरिकांचा आवाज बुलंद केला आहे. सोमवारी पंचायत समितीत त्यांनी अचानक भेट देत अनुपस्थित असलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला गांधीगिरी करत हार घातला. यात प्रामुख्याने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याही खुर्चीला त्यांनी हार घातला. त्यानंतर घरकुल लाभार्थ्यांचे पैसे घेतल्याची कंत्राटी अभियंत्याकडून प्रत्यक्ष कबुली घेतली होती.
हा कबुली चा व्हिडिओ सर्वत्र पसरल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्यांना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता या पदावरून कार्यमुक्त केल्याचे आदेश काढले.
मात्र लेटलतीफ केलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना प्रशासकीय चौकशीच्या नावाखाली दिलासा दिला का..? असा प्रश्न निर्माण होत आहे.
गटविकास अधिकारी व तहसीलदार हे देखील त्याची गैरहजर होते. आमदार पवार यांनी त्यांच्या खुर्चीला हार घातला होता. मग ह्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करण्यात आली. आमदार पवार यांच्या या कृतीने प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कार्यमुक्तीची कारवाई झाली.
मात्र कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासन कोणती कारवाई करणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे. आमदार राजेश पवार यांच्या या कृतीनंतर नायगावच्या प्रशासकीय यंत्रणेत एक हलकल्लोळ माजला असून पुढील काही दिवसांत अजून कुणा कुणावर कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.



