ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव पंचायत समितीचे ते 9 लाचखोर कंत्राटी अभियंते कार्यमुक्त : जिल्हा परिषदेची तडकाफडकी कारवाई

New Bharat Times नेटवर्क

नायगाव : घरकुलाचे देयके अदा करण्यासाठी लाच घेतल्याची कबुली देणाऱ्या नायगाव पंचायत समितीच्या 9 ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना जिल्हा परिषदेने दि. 29 रोजी रात्री तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे. एकाच पत्राने 9 ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आ.राजेश पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती.

नायगाव पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे कंत्राटी अभियंता हे गोरगरीब घरकुलधारकांची मोठ्या अर्थिक लुट करत होते. याबाबत अनेक तक्रारी आ.राजेश पवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे दि. 27 आक्टोबर रोजी आ.पवार यांनी या कंत्राटी अभियंत्याची एकत्रितपणे बैठक घेवून खरपूस समाचार घेतला. यावेळी अनेक कंत्राटी अभियंते घरकुलाचे देयके अदा करण्यासाठी पैसे घेत असल्याची कबुली दिली तसा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर आ. पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रारही केली होती.

घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी दि. 28 रोजी आपल्या दालनात बोलावून चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर या कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांवर कारवाई होणार असे संकेत मिळत होते. पण दि. 29 रोजी दि. 27 रोजीच्या प्रकरणाचा संदर्भ देत आ.राजेश पवार, यांनी पंचायत समिती, नायगांव कार्यालयास भेट दिली असता ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, डाटा एन्टी ऑपरेटर व ईतर अधिकारी घरकुल लाभार्थ्यांचे देयके काढण्यासाठी पैसे घेतात व जाणून बुजून तांत्रीक अडचन दर्शवुन विलंब करतात अशी कबुली देऊन स्वतः मान्य केल्याची व्हिडीओ क्लिप प्रसारमाध्यमांच्या स्वरुपात व्हायरल झालेली आहे.

आ.राजेश पवार, यांच्या समोर आपण असे स्पष्ट केलेले आहे की घरकुल लाभार्थ्याकडुन आपण लाच घेता असे स्पष्ट व्हिडीओ क्लिप मध्ये मान्य केलेले आहे. त्यामुळे अर्जुन प्रभाकरराव जाधव, शेख समिर, ओमप्रकाश विश्वनाथ पांडागळे, सुजित शिवराम दाताळकर, धोंडीबा मारोती उपासे, आडे संतोष किशन, ऋषिकेश नामदेव सरादे, मोहम्मद इब्राहिम, संतोष माधवराव वडजे अदि 9 ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता या पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker