ताज्या बातम्यानांदेडबिलोली

हर्ष गौतम मस्के यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

मोरे मनोहर

किनाळा :- केंद्र सरकारने दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दहशतवाद विरोधी कारवाई व गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुरक्षा विभागांसह पोलीस, सीबीआय, आयबी, एनसीबी, एनआयए तसेच पोलीस महानिरीक्षक यांच्यापासून ते अधिकारी व अंमलदारांना संपूर्ण देशात 1466 केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर केले आहे. यामध्ये 21 दिवसाचे नॅक्सलविरोधी अभियान “ऑपरेशन ब्लेक फॉरेस्ट” (“के.जि.एच हिल्स”) मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बीड शहर चे हर्ष गौतम मस्के, सहाय्यक कमांडंट पोलिस, सी.आर.पी.एफ यांना हा बहुमान मिळाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की हर्ष गौतम मस्के सद्या उपअधीक्षक कोबरा बटालियन, बालाघाट, मध्य प्रदेश येथे कार्यरत आहेत. आपल्या कोबरा कमांडो सोबत त्यांनी ऑपरेशन ब्लेक फॉरेस्ट मध्ये सतत 21 दिवस छत्तीसगढ जंगल मध्ये राहून नॅक्सविरोधी ऑपरेशन पुर्ण केले.

यापूर्वी त्यांना दोन वेळस पोलीस महासंचालकांनी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. या आधी त्यांनी झारखंड येथे ही आंतरिक सुरक्षेची उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाल्यामुळे त्यांचा मान अजून वाडला आहे.

हर्ष गौतम मस्के हे UPSC CAPF 2018 चे अधिकारी आहेत ते गौतम बाबुराव मस्के (सेवा निवृत्त.विधि अधिकारी एस.टी महामंडळ) आणी वंदना गौतम मस्के यांचे चिरंजीव तर बाबूराव मस्के (मा.दारूबंदी अधिकारी) आणि लक्ष्मीबाई बाबूराव मस्के (मा.जिल्हा परिषद सभापती ) यांचे नातू आणि बीड चे मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे हे हर्ष चे सासरे आहेत.

हर्ष मस्के यांनी आपल्या या यशाचे श्रेय पत्नी अनामिका बाबूराव कांबळे, मुलगा आयांश आणि समस्त मस्के व कांबळे परिवार ला दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker