कुंडलवाडी नगरपरिषद निवडणूक ◆ भाजपचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण असेल
◆सोमवारी किंवा मंगळवारी प्रदेश कार्यालयातून जाहीर होणार उमेदवारी ◆ सुत्रांची माहिती

कुंडलवाडी :- भाजपच्या जिल्हास्तरीय कोअर कमिटी कडून दि. 7 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे कुंडलवाडी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या यानंतर कोअर कमिटीचा अहवाल तसेच भारतीय जनता पक्षाकडून नेमण्यात आलेल्या समितीचा सर्व्र्हे रिपोर्ट प्रदेश कार्यालयात सोमवार सकाळपर्यंत सादर होणार आहे.
त्यानंतर प्रदेश कार्यालयातून कुंडलवाडी नगरपालिका निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असून भाजपचा नगराध्यक्ष पदाची लॉटरी कोणाला लागेल याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले असून नगराध्यक्ष पदाच्या तिकिटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या शहरात जागोजागी याबाबत चर्चेला उधान आले असून आमच्याच साहेबाला तिकीट फायनल झाले आहे असे कार्यकर्ते सांगत आहेत मात्र शहरातील नागरिकांचे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण असेल याकडे लक्ष लागले आहे.



