किनाळा येथील शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यास आमदार जितेश अंतापुरकर यांना वेळच नाही ?

मोरे मनोहर
किनाळा :- शेतकऱ्यासह सामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडून सोडवण्यासाठी जनतेचा सेवक म्हणून जनतेने निवडून दिलेले देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांना किनाळा तालुका बिलोली येथील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या पावसामुळे खरडून गेलेल्या शेती संबंधि शेतकऱ्यांचे प्रश्न सांगण्यासाठी फोन केला असता आमदारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून न घेताच मी पुन्हा फोन करतो असे सांगून फोन कट केल्याने शेतकऱ्याचे प्रश्न ऐकून घेण्यास आमदारांना वेळ नाही का असा संतप्त सवाल शेतकऱ्यातून व्यक्त केल्या जात आहे.
किनाळा तालुका बिलोली येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे नाल्यांना पूर येऊन पिकासह जमिनी खरडून गेल्या तर कित्येक शेतकऱ्यांच्या नाल्या लगत असलेल्या विहिरीत पुराची गाळ पडून विहिरीही बुजल्या यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी वारंवार प्रशासनाकडे विनंती करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने किनाळा तालुका बिलोली येथील एका शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी विद्यमान आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना फोन करून शेतकऱ्याचे प्रश्न सांगण्याचा प्रयत्न केले मात्र आमदाराने संबंधित शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून न घेताच त्यांना मी नंतर बोलतो असे सांगून फोन कट करून दोन दिवस उलटले तरीही सदरील शेतकऱ्यांना फोन केलेच नसल्याने शेतकऱ्याचे प्रश्न न ऐकून घेणाऱ्या आमदारासंबंधी शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
सदरील शेतकऱ्याचे प्रश्न आमदारही ऐकून घेत नसल्याने त्याच शेतकऱ्यांनी नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांना फोन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले असता खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन सदरील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन असा विश्वासही शेतकऱ्यांना खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी दिले असून शेतकऱ्यांना 16 नोव्हेंबर पर्यंत न्याय न दिल्यास 17 नोव्हेंबर रोजी नांदेड देगलूर राज्य महामार्गावर सकाळी दहा वाजता किनाळा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाअधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे.



