ताज्या बातम्यानांदेडनायगांव

तहसीलदारांचा अवमान प्रकरण पेटले ; विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना चार दिवसांत चौकशी अहवाल देण्याच्या सुचना

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : विधानसभा क्षेत्रातील अत्यंत गंभीर प्रकरणात विभागीय प्रशासनाने थेट हस्तक्षेप करत जिल्हाधिकाऱ्यांना चार दिवसांच्या आत स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल सादर करण्याचे कठोर आदेश दिले आहेत. त्यामुळे आ. राजेश पवार यांच्या राजकीय दादागिरीवर वचक बसेल असज बोलल्या जात आहे.

सुट्टीवर असताना नायगावच्या तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या रिकाम्या खुर्चीवर आमदार राजेश पवार यांनी पुष्पमाळ ठेवून त्यांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप झाला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राहुल दत्ता जिंगळेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर महिला आयोगाने दखल घेतली होती. त्यानंतर आता विभागीय आयुक्तांनीही असामान्य वेगाने उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सदरच्या चौकशी आदेशानंतर हे कृत्य “अधिकाऱ्यांचा सार्वजनिक अवमान, अनुसूचित जातीच्या महिला अधिकाऱ्याचा अपमान, आणि राजकीय दबावाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. या प्रकरणाने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, “राजकारणाच्या अहंकाराने अधिकारी वर्गाचा अपमान चालणार नाही” असा सूर मजबूत सुर निघत आहे.

राहुल जिगळेकर यांनी केलेल्या तक्रार अर्जात नायगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश पवार यांनी तहसीलदार श्रीमती धम्मप्रिया गायकवाड यांच्या सासऱ्याचे दुःखद निधन झाल्याने त्या सुट्टीवर असताना त्यांच्या खुर्चीवर पुष्पमाळ अर्पण करुन त्यांचा अपमान केला, असे नमूद केले आहे. सदर तक्रार अर्जातील नमुद मुदयांबाबत योग्य ती चौकशी करून आयोगास अभिप्रायासह अहवाल सादर करणे बाबत कळविण्यात आले आहे. सबब संदर्भिय पत्र सहपत्रासह यासोबत पाठविण्यात येत आहे. तरी प्रकरणात चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल ०४ दिवसात या कार्यालयास सादर करावा अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट अहवाल दिल्यास मुद्दाम अपमान, सार्वजनिक सेवकाचा अवमान व कार्यात अडथळा आणि अनुसूचित जातीच्या महिला अधिकाऱ्याचा अवमान अशा प्रकारचा गुन्हा नोंद होवू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker