तलबिड येथील जुगार अड्ड्याचा मुख्य सुत्रधार घुंगराळ्याचा ‘गांधी’ फरार

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तलबिड येथील जुगार अड्ड्याचा मुख्य सुत्रधार हा घुंगराळा येथील संजय शंकर बाणेवाड हाच असून. तो घुंगराळा परिसरात व जुगाऱ्यात ‘गांधी’ या टोपण नावाने परिचित आहे. परंतु दि. 25 रोजीच्या छाप्या दरम्यान पोलीसांच्या हातावर तुरी देवून अन्य एका सहकाऱ्यासोबत फरार झाला आहे. आतापर्यंत पोलीसांच्या हाती लागला नाही.
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील संजय शंकर बाणेवाड हा काही सहकार्यासोबत लपूनछपून व दररोज जागा बदलून जुगार अड्डा चालवतो. विशेष म्हणजे पोलीसांच्या हाती लागू नये यासाठी फिरता जुगार अड्डा चालवण्यात तरबेज होता. जुगाऱ्यांना दररोज नवीन लोकेशन पाठवून निरोप देत होता पण दि. 25 रोजी बिलोलीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यास तलबिडच्या जुगार अड्ड्याचे लोकेशन मिळाले. त्या मिळालेल्या माहीतीनुसार कारवाई करण्यात आली. यात शेख खादीर दस्तगीर रा. घुंगराळा तालुका नायगाव, गणपती गोविंदराव जाधव रा.सुगाव तालुका नायगाव, भगवान गणपती ढगे रा. सावरखेड तालुका नायगाव.
माधव कोंडीबा सुगावे रा, घुंगराळा तालुका नायगाव, साईनाथ बाबू गायकवाड रा. सावरखेड तालुका नायगाव, माणिका बळी वानखेडे रा. सावरखेड तालुका नायगाव, अविनाश प्रकाश माचनवाड रा, हंगरगा तालुका उमरी, शंकर गणपती देवडे, भाजी मार्केट इतवारा नांदेड, हनुमंत गंगाधर वानखेडे रा.सावरखेड तालुका नायगाव, नागोराव आनंदा गायकवाड रा. सावरखेड तालुका नायगाव, संजय शंकर बाणेवाड रा.घुंगराळा तालुका नायगाव व गणेश बालाजी पवळे राहणार कोपरा तालुका नायगाव अदि १२ जुगारी अंदर बाहेर नावाचा खेळत होते.
मात्र यावेळी या जुगार अड्याचा मुख्य सुत्रधार असलेला घुंगराळा येथील संजय शंकर बाणेवाड व कोपरा येथील गणेश बालाजी पवळे यांनी पोलीसांच्या हातावर तुरी देवून पळ काढण्यात यशस्वी झाले. कारण संजय बानेवाड हा जुगार अड्डा चालक असून तो घुंगराळा परिसरात व जुगाऱ्यात ‘गांधी’ या टोपण नावाने परिचित आहे. पण छाप्या दरम्यान गांधी ने स्वतः तर पळ काढलाच पण गणेश पवळे यालाही सोबत घेवून गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
संजय शंकर बाणेवाड उर्फ ‘गांधी’ हा काही पोलीसांचे हात मजबूत करुनच अनेक वर्षांपासून घुंगराळा परिसरात जुगार अड्डा चालवत होता. पण ‘गांधी’ च्या या जुगार अड्याची माहिती बिलोलीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पाळत ठेवली होती आणि काल दि. 25 रोजी त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला.



