गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

देगाव मध्ये बिबट्याचे दर्शन रान डुकराची केली शिकार : वन विभागाची टीम घटनास्थळी, ट्रॅप कॅमेरे लावले

प्रकाश महिपाळे

नायगाव : तालुक्यात गत महिनाभरापासून बिबट्याचा वावर अनेक ठिकाणी दिसून आला आहे. बिबट्याने तालुक्यात धुमाकाळ घातला असून देगाव शिवारात बिबट्याने रान डुकराची शिकार केल्याचे शनिवारी सकाळी ८.30 च्या दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा एकदा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरच्या घटनेची माहिती समजल्यानंतर वन विभागाने देगाव येथे ट्रँप कँमेरे लावले असून यात बिबट्या दिसला तर पिंजरे लावण्यात येणार आहेत.

दि.29 नोव्हेंबर रोजी नायगाव तालुक्यातील कृष्णूर एमआयडीसीच्या एका कारखान्याच्या परिसरात बिबटयाचे प्रथम दर्शन झाले. अनेक दिवसानंतर दि.20 डिसेंबर रोजी रानसुगाव येथील रावसाहेब जाधव यांच्या शेतात बांधलेल्या कालवडीचा फाडशा पाडला. यानंतर लगेच 2 दिवसात दि. 23 डिसेंबर रोजी बिबटयाने मुस्तापूर येथील हनुमंत नेमाळे यांच्या शेताच्या लगत असलेल्या पुलाजवळ हरणाची शिकार करून आपले अस्तित्व दाखवून दिले तर 27 डिसेंबर रोजी देगाव येथील गणेश गायकवाड यांच्या शेताशेजारी नाल्याच्या बाजूला वराहाची शिकार केली असल्याचे आढळून आले.

यावेळी बिबट्याने नदीपार करताना काही नागरिकांनी प्रत्यक्ष पहिल्याचे सांगितले. शनिवारी सकाळी देगाव शिवारात बिबट्याने वराहाची शिकार केली यावेळी वराहाणे जोरजोरात आवाज केला ते एकूण परिसरातील दोन ते तीन कुत्रे घटनास्थळी भुंकत आल्याने बिबट्याने आपली शिकार सोडून नदी पलीकडे पलायन केले. असे प्रत्यक्षदर्शी शेतकरी व्यंकट विभुते यांनी सांगितले. घटनास्थळी अर्धवट मृत अवस्थेत वराह आढळून आला आहे.

बिबट्याचा गत महिन्यापासून नायगाव तालुक्यात वावर असल्यामुळे शेतकरी, कामगार व नागरिकात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करण्यास जाणाऱ्या वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे कृष्णूर, रानसुगाव व मुस्तापूर या तालुक्यातील वेगवेगळ्या भागात बिबटयाने नागरिकांवर हल्ला करत 2 ते 3 मुक्या प्राण्यांचा बळी घेतला आहे. बिबट्या नेमका तालुक्यातील कोणत्या भागात आहे आणि तो कोणावर हल्ला करेल याबाबत नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

देगाव येथे बिबट्याने रानडुक्कराची शिकार केल्याच्या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे सर सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) नांदेड, भारत खेलबाडे यांचे मार्गदर्शनानुसार तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर रामराव देवकते यांच्या सूचनेप्रमाणे मौजे देगांव येथे घटनाथली जाऊन सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी चर्चा करुन ट्रँप कँमेरे लावण्यात आले.

तसेच वनपरिमंडळ अधिकारी नरसी श्री.संतवाले सर, वनरक्षक नरसी एस पी बगाटे व वनरक्षक गजानन कोतलवार मांजरम व डी.एल.सांगवीकर वनरक्षक व वनसेवक गोविंद जाधव व वनसेवक वाघमारे लोकांमध्ये बिबट्या बाबत जनजागृती करून लोकांना सावध सुरक्षित राहण्याचे सूचना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker