ताज्या बातम्यानांदेडनायगांव

पत्नीने केस केली म्हणून पत्तीला पेट्रोल टाकून जाळले : नायगाव तालुक्यातील बेंद्री येथील घटना

प्रकाश महिपाळे

नायगाव : विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला म्हणून पिडीत महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्यात आल्याची घटना नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे दि. 29 रोजी पहाटे 5.30 च्या दरम्यान घडली. या घटनेत पन्नास टक्के जळालेल्या पिडीतेच्या पतीवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सदर प्रकरणातील तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे बेंद्री येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. असून बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शाम पानेगावकर यांनी भेट देवून शांतता बाळगण्याचे आवाहन केले.

नायगाव तालुक्यातील बेंद्री येथील संतोष माधवराव बेंद्रीकर या तरुणाने घरासमोर असलेल्या महिलेवर अनेक दिवसापासून वाईट नजर होती. सदरच्या महिलेला अश्लील शेरेबाजी करण्याबरोबरच दि. 22 डिसेंबर रोजी हात धरुन ओढल्याने सदरील महिलेने नायगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरुन संतोष बेंद्रीकर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद झाल्यापासून सदर पिडीत महिलेच्या आणि बेंद्रीकर कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. गुन्हा नोंद झाल्यावरही आरोपी मोकाट असल्याने परिस्थिती स्फोटक बनली आणि पिडीत महिला विनयभंग प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करत होती.

विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीचे वडील माधव बेंद्रीकर यांनी दि. 29 रोजी पहाटे 5.30 वाजताच्या दरम्यान पिडीत महिलेचे पती एकनाथ व्यंकटराव माचापुरे यांना गाठले व तुझ्या बायकोने माझ्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला असा जाब विचारला यावेळी आरोपी संतोष माधव बेंद्रीकर व आरोपीचा भाऊ शिवकुमार माधव बेंद्रीकर हे ही होते. गुन्हा नोंद करण्यावरुन वादावादी झाली अचानक तिघांनी माचापुरे यांच्यावर चक्क पेट्रोल टाकून जाळले. यात ते 50 टक्के जळाले आहेत. जळालेल्या अवस्थेतच एकनाथ माचापुरे यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

घटनेची माहिती समजताच नायगाव पोलीस बेंद्री येथे धाव घेवून तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे बेंद्री येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शाम पानेगावकर यांनी भेट देवून शांतता बाळगण्याचे आवाहन केले. सदरील घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नरसिंह पोमनाळकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker