ताज्या बातम्यानांदेडनायगांव

आजोबाच्या वयातील व्यक्तीने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

प्रकाश महिपाळे

नायगाव : आजोबाच्या वयाचा असलेल्या नराधमाने ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना काल दि. 3 जानेवारी रोजी लालवंडी ता. नायगाव येथे घडली. सदर प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने लालवंडी गाठत आरोपीला ताब्यात घेतले.

नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील एक 8 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरा बाहेर खेळत असतांना वय वर्ष 60 असलेल्या तुळशीराम विठ्ठल इंगळे या नराधमाने तिच्याच आजोबाच्या बंद असलेल्या घरात नेवून दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरलेल्या मुलीने तेथून पळ काढला आणि घडलेली घटना आईला सांगितली. घटना ऐकल्यावर सदर पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने दि. 3 जानेवारी रोजी रात्री थेट नायगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

यात माझ्या नवऱ्याची तब्येत ठिक नसल्याने ते घरी झोपुन होते माझे सासु, सासरे हे देव दर्शनासाठी इकळी माळ येथे गेले होते व माझी 8 वर्षाची मुलगी ही शाळेला गेली नव्हती. ती घरीच खेळत होती. त्यानंतर वेळ अंदाजे दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान खेळण्यासाठी ती घराबाहेर गेली होती. दुपारी वेळ अंदाजे 4 वाजताच्या सुमारास ती घरी आली असता माझ्या मुलीने सांगितले की, “मी आण्णा भाऊसाठे समाज मंदिराजवळ खेळत असताना तेथे तुळशिराम बाबा आला व माझा हात धरुन मला तिथुन आपल्या जुन्या घरामध्ये नेवुन त्याने माझे हात धरुन त्याचे पोटावर बसवुन मला तुझे कपडे काड असे म्हणाला असता मी झटका देवुन तेथुन पळुन आले असे तक्रारीत नमूद केले.

सदर महिलेची तक्रार नोंदवून घेतांनाच पोलीस उप निरिक्षक गजानन तोटेवाड, पो.हे.कॉ साई सांगवीकर, बाबु चरकुलवार, पो.कॉ. बालाजी बामणे, पो.कॉ.बालाजी शिंदे, पो.कॉ.ज्ञानेश्वर पुणेबोईनवाड अदिंनी तत्काळ लालवंडी गाठली व आरोपीस ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर घटनेची माहिती समजताच बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर, नायगावचे पोलीस निरीक्षक एस.एन.मारकड यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर रविवारी बिलोलीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात उभ करण्यात आले. यावेळी न्यायाधिशांनी नराधमाची 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे नायगाव पोलिसांनी जिल्हा कारागृहात नेवून सोडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker