ताज्या बातम्यानांदेडनायगांव

देगलूर तालुक्यातील खानापूरच्या दोन तरुणांचा कंधार तालुक्यात झालेल्या अपघातात मृत्यू

New Bharat Times नेटवर्क

देगलूर : तालुक्यातील खानापूर येथील दोन तरुण रविवारी सकाळी माळेगाव ता.कंधार येथे जात असताना रुई या गावच्या वळणावर भरधाव मोटारसायकलवरचा ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात मारुती चांदोबा गायकवाड (23) व दीपक घंटेवाड पाळेकर (21) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना रविवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बेळकोणी ता.बिलोली येथील मूळ रहिवासी असलेला मारुती चांदोबा गायकवाड (23) गेल्या कांही वर्षापासून तो आजोळी खानापूर येथे राहत होता. रोजंदारीवर काम करुन कुटंबाचा उदरनिर्वाह करत होता. तर दीपक घंटेवाड पाळेकर (21) हा मुखेड तालुक्यातील पाळा येथील रहिवासी असून. त्याची आई ही खानापूर येथे अनेकवर्षापासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते यावर त्यांच्या कुटूंबाचा डोलारा चालत होता. तोही आईला मदत करण्यासाठी भाजीपाला विक्रीचे करण्याचे काम करायचा. रविवार सकाळी दि.5 रोजी खानापूरहून मोटरसायकलवर सकाळी सात वाजता मारुती गायकवाड व दीपक घंटेवाड माळेगावला जातो म्हणून घरी सांगून निघाले होते.

कंधार तालुक्यातील माळेगावला जात असतांना कंधार तालुक्यातील रुई गावाजवळील वळणावर भरधाव मोटरसायकल नियंत्रित करता न आल्याने मोटारसायकल रस्ता दुभाजकावर आदळली झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गावात कळताच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कंधारकडे रवाना झाले. रविवारी रात्री उशिरा खानापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker