Uncategorized

कोलंबी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला चांगला प्रतिसाद…

नायगाव : – नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या योजनेअंतर्गत गावामध्ये विविध विकास कामे करण्यात आली. यावेळी कोलंबी गावामध्ये स्वच्छता अभियान तसेच नालिसफाई, वृक्षलागवड, ग्रामपंचायत डिजिटल करणे, आपले सरकार सेवा केंद्र अद्यावत करणे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे सौचालय दुरुस्ती, वृक्ष लागवड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, किचनशेड, परसबाग तसेच स्म्शानभूमी येथे वृक्षलागवड.

पिण्याच्या पाण्याची व्यवसथा, लाईटची व्यवस्था, बसण्यासाठी सिमेंट बेंच, रंगरगोटी, ग्रामपंचायत व उपकेंद्र मार्फत विविध आरोग्य शिबीर राबविण्यात आले, ग्रामपंचायत, जि.प.शाळा, धार्मिक स्थळें व गावाअंतर्गत सुरक्षितेसाठी सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले तसेच शासकीय इमारतीना रेन हार्वेस्टिंग चे काम व गावामध्ये करवसुली करण्यात येत आहे तसेच लोकसहभागातून श्रमदान करून वनराई बंधारा उभारण्यात आला.

या उपक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत कोलंबीचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी श्री.टी.जी.पाटील रातोळीकर, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील सर्व विभागाचे कर्मचारी तसेच गावातील सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker