ताज्या बातम्यानांदेडनायगांव
बळेगाव येथे 22 हजाराचा देशी व विदेशी दारुचा साठा जप्त

नायगाव : तालुक्यातील बळेगाव येथे देशी व विदेशी दारुचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाल्याने कुंटर पोलिसांनी छापा मारत नागेश दत्ता बेलकर यांच्या घरातून देशी व विदेशी दारुचा 22 हजाराचा साठा जप्त केला.
बळेगांव ता नायगांव येथे अवैद्य दारू विक्री होत असले बाबत माहीती मिळल्याने दि. 5 जानेवारी रोजी सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक मल्लिकार्जुन कारामुंगे, बिट अंमलदार पोहेकॉ पवार, स्वामी, महीला पोलीस अंमलदार सुनिता अलमोड यांनी आरोपी नामे नागेश दत्ता बेलकर वय 43 वर्ष रा.बळेगांव ता. नायगांव यांच्या राहत्या घरी देशी विदेशी दारूचा साठा एकुण- देशी दारू १८०८० विदेशी दारू ३९७५ रूपये चा असा एकुण २२०२५/-चा मुदेमाल जप्त केला आहे.



