रामपूरच्या जुगार अड्ड्यावर केलेली कारवाई लपवण्याचा रामतीर्थ पोलीसांचा प्रयत्न

प्रकाश महिपाळे
नायगाव : रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील। रामपूर येथे रामतीर्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने मागील अनेक दिवसांपासून हाय प्रोफाइल जुगार अड्डा सुरु होता. या जुगार अड्ड्याच्या खरमरीत बातम्या प्रकाशित होताच पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांनी मंगळवारी त्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा मारला. पण केलेल्या कारवाईची माहिती लपवण्यात येत असल्याने रामतीर्थ पोलीसांचाच छुपा पाठींबा होता हे उघड झाले आहे.
काही दिवसापूर्वी रामतीर्थ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेड मारल्यानंतर पंधरा दिवस पोलीस मुख्यालयात मुक्काम करुन आलेले रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी मोठ्या अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत आहेत. अनेक गावात अवैध दारु विक्री तर सुरु झालीच आहे पण आता जुगार अड्डेही सुरु करण्यास परवानगी दिली.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामपूर येथे मागील काही दिवसापासून हाय प्रोफाइल जुगार अड्डा सुरु होता. हा जुगार अड्डा सर्व यंत्रणेला मँनेज करुनच सुरु करण्यात आला होता. त्यासाठी जुगार अड्डा चालवणाऱ्याने लाखो रुपये मोजले होते.पण दि. ६ जानेवारी रोजी वर्तमानपत्र आलेल्या बातमीने या हाय प्रोफाइल जुगार अड्ड्याचे बिंग फुटले.
त्यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आणि कारवाई करावी लागते यासाठी दि. ६ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक निरिक्षक शिवराज नरवाडे यांनी तेथे नियोजित धाड मारुन कारवाई केली. नरवाडे यांनी केलेल्या कारवाई नंतर रामपूर येथे जुगार अड्डा सुरु असल्याचे उघड झाले. संबधीत जुगार अड्डा चालकाने रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराचे हात मजबूत केले असल्याने केलेल्या कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ करुन लपवाछपवी करत आहेत.
कारवाई केल्यानंतर याची माहिती पत्रकारांना देण्यात काहीही अडचण नसावी पण जाणीवपूर्वक माहिती लपवण्यात आली आहे. याबाबत ठाणेदार विक्रम हाराळे व कारवाई केलेले अधिकारी शिवराज नरवाडे यांना फोन करुन माहिती देण्याबाबत बोलल्यानंतरही त्यांनी माहिती दिली नसल्याने या जुगार अड्ड्याला रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पाठबळ असल्याचे अधोरेखित झाले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…
बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक हालचालीची माहिती मिळते. यापूर्वी त्यांनी रातोळी व तलबिड येथील जुगार अड्याची माहिती मिळाली होती. तेथे त्यांनी कारवाई करत जुगाऱ्यांना अटकही केली होती. पण बिलोली तालुक्यातच मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या हाय प्रोफाइल जुगार अड्ड्याची माहिती त्यांच्यापर्यंत कशी काय पोहचली नाही याचे आश्चर्य वाटत आहे. या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली नाही का यांनीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले अशी दबक्या आवाजात चर्चा होत आहे.



