ताज्या बातम्यानांदेडबिलोली

भाऊ – भावाच्या नात्याचा आदर्श घालणारे खतगावकर बंधू- हभप पुरुषोत्तम महाराज

मोरे मनोहर

किनाळा :- आजच्या समाजात भाऊ–भावामधील नाती तुटताना एकमेकांशी संवाद न ठेवणारे किंवा वैर धरण्याचे प्रसंग वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी मागील पाच वर्षांपासून आपले थोरले बंधू स्वर्गीय मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून त्यांचे विचार समाजात जिवंत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या भाऊ भावाच्या नात्यांचा खादगावकरांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे असे प्रतिपादन हभप पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणेकर यांनी केले.

ते बिलोली तालुक्यातील खतगाव येथे ६ जानेवारी रोजी स्वर्गीय मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलत होते. माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून ६ जानेवारी रोजी स्वर्गीय मधुकरराव पाटील खतगावकर यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जाते. यावर्षी या निमित्ताने हभप पुरुषोत्तम पाटील महाराज बुलढाणेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. यावेळी शेकडो पदाधिकारी व नागरिकांनी स्वर्गीय मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यावेळी पुढे म्हणाले की देशातील शेतकरी व सैनिक हेच दोन घटक सातत्याने संकटात असल्याचे नमूद केले. शेतीमालाला योग्य भाव नसताना इतर सर्व वस्तूंचे दर मात्र गगनाला भिडल्याची शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी कीर्तनाच्या शैलीतून मांडली. तसेच देशातील वाढता जातीयवाद, मानवी प्रवृत्तीतील बदल आणि महिलांवरील वाढते अत्याचार यावरही त्यांनी भाष्य केले. लाडकी बहीण योजनेसोबतच सुरक्षित बहीण योजना प्रभावीपणे राबविली असती तर महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी झाले असते असा संदेश त्यांनी दिला.

या कार्यक्रमास माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आमदार जितेश अंतापुरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, डॉ.मिनल पाटील खतगावकर यांच्यासह शिरीष भाऊ गोरठेकर, कैलास गोरठेकर, गणेश करखेलीकर, हणमंत चव्हाण, रवी पाटील खतगावकर, विजय पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, प्रताप पाटील जिगळेकर, भास्कर पाटील भिलवंडे, अशोक पाटील मुगावकर, अरुण पाटील एकंबेकर, नितीन आगळे, कामाजी पवार, शिवाजी कनकटे, मंगल देसाई, यादवराव तुडमे, भीमराव जेठे, प्रभाकर पेंटे, अंबादास शिनगारे, अरविंद पेंटे, गुंडेराव नाईक, प्राचार्य धनंजय शेळके, प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, मुख्याध्यापक धोंडीबा वडजे तसेच परिसरातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker