ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी शहर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ.माधव हळदेकर तर सचिव पदी कुणाल पवारे यांची बिनविरोध निवड

कुंडलवाडी :- येथील शहर मराठी पत्रकार संघाची दि.७ जानेवारी रोजी पत्रकार डॉ.माधव हळदेकर यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ पत्रकार गणेश कत्रुवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत शहर मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉ.माधव हळदेकर यांची व उपाध्यक्षपदी हरिष देशपांडे तर सचिव पदी कुणाल पवारे, कार्याध्यक्षपदी अशोक हाके व कोषाध्यक्ष पदी मोहम्मद अफजल मोहम्मद इब्राहिम, सहसचिव पदी माजीद नांदेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. सदस्यपदी गणेश कत्रुवार, शंकर कोंडावार, मैनोद्दीन शेख, डॉ. नरेश बोधनकर, सुगत नंदूरकर, राजेश्वर कोलबंरे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker