ताज्या बातम्यानांदेडनायगांव

इन्स्पायर अबॅकस नॅशनल लेव्हल स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नायगाव :- सनराइज एज्युकेशन सोसायटी यांच्या इन्स्पायर अबॅकस अकॅडमी मार्फत 4 जानेवारी 2026 रोजी कंधार येथे घेण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये शिक्षिका सौ.स्वाती रातोळीकर (घोरबांड) यांच्या मार्गदर्शनाखाली कलंबरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत जवळपास 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अवघ्या पाच मिनिटांचा वेळ देऊन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 200 पेक्षा अधिक अचूक गणिते सोडवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

या परीक्षेत कु.सान्वी वर्ताळे (सेकंड रँक) सात्विक तुकाराम रातोळीकर (फोर्थ रँक) कु.अक्षरा मुक्कनवार (फिफ्थ रँक), कु.वीरा मुक्कनवार (सेवेन्थ रँक), विराज मुक्कनवार (नाईन रँक) व सर्वेश मुक्कनवार आणि इतर अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त केले आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व स्मार्टवॉच देऊन गौरविण्यात आले आहे.

स्वाती रातोळीकर मॅडमचे नवीन कौठा नांदेड येथे ऑनलाईन व ऑफलाईन अबॅकस आणि कोचिंग क्लास चालतात, “मॅडमच्या जिद्द आणि मेहनती मुळेच त्यांच्या क्लास मधील सर्व विद्यार्थी यशस्वी झाले आहेत तसेच रातोळीकर मॅडम कडे विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नाही तर जीवनोपयोगी संस्कार देखील मिळतात असे पालकांचे मत आहे”.

इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या संचालिका व संचालक मंडळ आणि सर्व शिक्षिकांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker