कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दर्पण दिन साजरा
◆सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांच्याकडून पत्रकारांचा लेखणी, डायरी व एक रोपटे देऊन यथोचित सन्मान

कुंडलवाडी :- येथील पोलिस ठाण्यात ६ जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंतीनिमित्त दर्पण दिन चा कार्यक्रम दि.१० जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे हे होते. मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पोलीस ठाण्याच्या वतीने दर्पण दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा लेखणी, डायरी व एक रोपटे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर या़च्यासह पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गफूर शेख, पोहेकाँ एस.बी.शिंदे, पी.आर.मेडेवार, अर्जुन खनपटे, अरुणा श्रीवास्तव रघुवीरसिंह चौहाण, शिवा गंगगुलवार, आनंद बोडके, व्यंकट घोंगडे, रवीकुमार देशमुख, अजय बोलमवार, रामेश्वर पाटील, बबीता पाटील यांच्या सह शहरातील विविध वर्तमानपत्राचे तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.



