ताज्या बातम्यानांदेडनायगांव

महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून चार लाखाचा विमा मयताच्या वारसाला वाटप

बँकेच्या सर्व खातेदार महिला पुरुषांनी आपला विमा काढावा - शाखा अधिकारी भीमराव सोनकांबळे यांचे आव्हान…

कुंटूर:- नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक कुंटूर शाखा अधिकारी श्री भीमराव सोनकांबळे यांनी कुंटूर येथील मयत परमेश्वर झुंजारे यांच्या वारस संगीता परमेश्वर यास दोन लाख प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व दोन लाख प्रधानमंत्री जन सुरक्षा विमा योजना अंतर्गत एकूण चार लाखाचा चेक त्यांना प्रदान करण्यात आला. विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त बँकेमध्ये प्रधानमंत्री जनजीवन सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना अंतर्गत माहिती कुंटूर येथील महिला बचत गटांना देण्यात आले.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. परमेश्वर झुंजारे यांच्या मृत्यू दोन महिन्याखाली झाला होता त्यांना तिन महिन्याच्या आत बँक शाखा अधिकारी भीमराव सोनकांबळे यांनी पाठपुरावा करून सदर विमा रक्कम देण्यात आली. सगळी कागदपत्रे दाखल करून दोन महिन्यांमध्ये त्यांना वीम्याचा क्लेम मिळवून दिला व त्यांच्या वारस पत्नी संगीता परमेश्वर झुंजारे यांना चार लाख रुपयाचा चेक देऊन त्यांना सन्मान केले. यावेळी सर्व ग्राहक व नागरिक व महिला पुरुषांनी यांनी आपल्या परिवाराचा महिला पुरुष यांचा विमा काढून घ्यावा व विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी बँक शाखा अधिकारी सोनकांबळे यांनी केले आहे.

यावेळी बँक अधिकारी भीमराव सोनकांबळे, रोहित पाटील बँकऑफीसर, सुमित दीक्षित कॅशियर, श्रीमती संगीता परमेश्वर झुंजारे, सुनील तोडे, नागेश काशराळीकर सेवक, ग्रामसखी रेखाबाई कांबळे कुंटूरकर, बँक सखी मायावती सूर्यकर ग्रामसखी विद्या हनुमंते व इतर अधिकारी दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker