ताज्या बातम्याधर्माबादनांदेड

धर्माबाद येथे भरधाव कंटेनरची ऑटोला भीषण धडक ; तिघे गंभीर जखमी

अंकुशकुमार देगावकर

धर्माबाद : शहरात आज सकाळी सुमारे 7.30 वाजता एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका कंटेनरने तीनचाकी लोडिंग ऑटोला जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या धडकेत ऑटोतील तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

अपघातानंतर कंटेनर चालक पळून जात असताना स्थानिक नागरिक व पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला. अखेर उमरीजवळ कंटेनर पकडण्यात आला. या अपघातात दुर्दैवाने दोन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

अपघाताचे नेमके कारण, कंटेनरचा वेग व चालकाची जबाबदारी याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी भरधाव व बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker