युरिया खताची कृत्रिम टंचाई ; शेतकऱ्याची लूट

मोरे मनोहर
किनाळा :- सध्या शेतात असलेल्या अनेक रब्बी पिकांसाठी लागणाऱ्या युरिया खताची नरसी येथील कृषी दुकानदार कृत्रिम टंचाई निर्माण करुन शेतकऱ्यांना अवाच्या सव्वाभावाने युरिया खताची विक्री करून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याने याकडे कृषी विभागाने तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांची लूट करनार्या कृषी दुकानदाराविरुद्ध तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना मुबलक खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.
शेतकऱ्यांना हरभरा, ज्वारी, गहू, करडई, सूर्यफूल, भोईमुंग आधी सह अनेक रब्बी पिकांना टाकण्यासाठी लागणारे युरिया खत नरसी व परिसरातील कृषी दुकानदार खत उपलब्ध नसल्याचे सांगून त्याच शेतकऱ्यांना हेच दुकानदार दुकानाची पावती न देता बिगर पावतीचे तीनशे ते चारशे रुपयांना युरिया खत बे भावात देत आहेत. शेतकऱ्यांना खताची अत्यंत गरज असल्याने अनेक शेतकरी दोन पैसे जास्त गेले तरी खत मिळवण्यासाठी कृषी दुकानदाराकडे धावपळ करून युरिया खत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नरसी व परिसरात असलेल्या अनेक कृषी दुकानदाराकडे युरियाचा साठा आहे मात्र ते युरिया खत मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध नाही असे सांगून अनेक कृषीदुकानदार हे त्याच शेतकऱ्यांची गरज ओळखून त्या शेतकऱ्यांना तीनशे ते चारशे रुपयांना हेच दुकानदार युरियाचे खत दुसऱ्याचे आहे हे मी तुम्हाला देतो असे सांगून चोरट्या पद्धतीने खताची विक्री करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
शंकरनगर व नरसी परिसरातील शेतकऱ्यांना लागणाऱ्या युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून आवाच्या सभा भावाने खताची विक्री करणाऱ्या कृषी दुकानदाराविरुद्ध कृषी विभागाने तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना मोलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.



