ताज्या बातम्यानांदेडनायगांव

जि.प.शाळा नरसी येथे दिव्यांग मुलांचे जिल्हास्तरीय मोजमाप शिबीर संपन्न ; २१० विद्यार्थ्यांची तपासणी

अंकुशकुमार देगावकर

नायगाव :- समावेशित शिक्षण जिल्हा परिषद नांदेड आणि शिक्षण विभाग पंचायत समिती नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, विशेष गरजा असलेल्या दिव्यांग मुलांसाठी जिल्हास्तरीय मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी येथे १४ मार्च २०२६ रोजी हे शिबीर उत्साहात पार पडले.

या शिबिरात नायगावसह देगलूर, बिलोली, धर्माबाद, उमरी आणि मुखेड अशा एकूण सहा तालुक्यांतील अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद आणि बहुविकलांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत एकूण २१० मुलांची सखोल तपासणी करण्यात आली. यापैकी ९० मुलांना पुढील आवश्यक साहित्य, साधने आणि उपकरणांसाठी संदर्भित (Refer) करण्यात आले आहे.
​मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नलबलवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी, गट समन्वयक मंगेश हणवटे, प्रकाश गोडणारे आणि जिल्हा समन्वयक रामदास वाघमारे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि शारीरिक पुनर्वसनासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले.

सदर जिल्हास्तरीय मोजमाप शिबीर यशस्वी करण्यासाठी आय.ई.डी (IED) तालुका समन्वयक प्रशांत सोनटक्के आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामुळे सहा तालुक्यातील अनेक गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा आणि साधनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker