भाजपाचा निष्ठावंत व बहुजनवादी चेहरा म्हणून नेतृत्वाची संधी बालाजी बच्चेवार यांना द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी
प्रकाश महिपाळे
नायगाव : भाजप आमदार राजेश पवार यांच्याबद्दलचा मतदारसंघात वाढलेला रोष पाहता भाजपाचा निष्ठावंत आणि बहुजनवादी चेहरा म्हणून विधानसभेच्या नेतृत्वाची संधी बालाजी बच्चेवार यांना द्यावी अश मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. बच्चेवार यांना संधी मिळाल्यास गटातटाच्या राजकारणाला मुठमाती मिळण्याचीही शक्यता आहे.
भाजपाचा निष्ठावान बहुजनवादी चेहरा म्हणून नायगाव विधानसभेच्या नेतृत्वाची संधी द्यावी अशी जोरदार मागणी नायगाव विधानसभा क्षेत्रात होत आहे. नायगाव विधानसभेच्या बदलत्या राजकीय समीकरणात वीरशैव लिंगायत समाज, मराठा समाज मुस्लिम समाज मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय अशा विविध सामाजिक स्तरांमधून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व शासकीय कर्मचारी यांच्याकडून उमेदवारीसाठी पाठबळ मिळत असल्याचा दावाही बच्चेवार यांच्या कार्यकर्त्यांनी केला.
भाजपाने नायगाव मध्ये जुन्या निष्ठावंतांना न्याय द्यावा कारण पक्षाला कठीण काळात पक्षाची पाळमुळ ग्रामीण भागात रुजवण्यासाठी बहुजनवादी तरुण चेहरा म्हणून प्रतिकूल परिस्थितीत गावोगावी अनवाणी फिरून बच्चेवार यांनी जनाधार मिळवून दिला. नायगाव बिलोली विधानसभेमध्ये प्रस्थापितांच्या दहशतीला झुगारून भाजपाची पहिली शाखा नायगाव मध्ये स्थापन करून पक्षाचा विस्तार केला हे कोणालाही नाकारता येणार नाही. नायगाव तालुका निर्मिती आंदोलनात कारावास भोगला सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना नाहक वेठीस धरून त्रास दिला गेला परंतु गोरगरीब जिगरबाज इमानदार निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बच्चेवार आणि पक्षाची साथ कधीच सोडली नाही.
तात्कालीन परिस्थितीत घराणेशाहीच्या बुरुजाला सुरुंग लावून चव्हाण घराण्याच्या उमेदवाराला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभूत करून भाजपाचा झेंडा नायगाव त्याचबरोबर बरबडा जिल्हा परिषद गटातून विद्यमान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला पराभूत करून बरबडा जिल्हा परिषद गटामध्ये मध्ये अभिमानाने रोवला. त्यानंतर अनेक निवडणुकीत पक्षाला विजयश्री मिळवून दिली चिडलेल्या, भेदरलेल्या विरोधकांनी जीव घेणे हल्ले केले त्यांची दडपशाही गल्लीबोळा ठेचून काढली. संघर्षाच्या अनेक ठिणग्या पडल्या त्यामुळे परंपरागत विरोधक म्हणून ग्रामीण भागात बच्चेवार यांना अधिक पसंती आहे.
नायगाव, नरसी, धर्माबाद, उमरी बिलोली भागातील भाजपाचा निष्ठावान शिलेदार सर्वसमावेशक बहुजनवादी चेहरा म्हणून उदयास आलेले नेतृत्व म्हणून बच्चेवार यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या तीन दशकापासून भाजपाचे एक निष्ठेने काम करणारे कुशल संघटक, प्रखर वक्ता, आजातशत्रू निष्कलंकित, चारित्र्यसंपन्न, कर्मयोगी नेतृत्व म्हणून गोरगरीब माणसात, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी आदि घटकांमध्ये बहुजन चेहरा म्हणून बच्चेवार परिचित आहे. अशा धाडसी नेतृत्वाने आजपर्यंत अनेक आंदोलने यशस्वी केले नायगाव विधानसभेत “शिवरायांची श्रीमंती आणि सह्याद्रीची उंची “लाभलेलं अफाट उत्साही नेतृत्वास निष्ठावंत बहुजनवादी चेहरा म्हणून भाजपाने नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी जोरदार मागणी पक्ष नेतृत्वाकडे बालाजी बच्चेवार यांच्या कार्यकर्त्यांनी केली.
नायगाव विधानसभेच्या बदलत्या राजकीय समीकरणात सर्व समावेशक बहुजनवादी चेहरा म्हणून एकमेव उमेदवार असल्यामुळे त्यांना पक्ष नेतृत्वाने निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहे.