कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना निवेदन
◆चेअरमन सुनील बेजगमवार यांची माहिती
कुंडलवाडी :- कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आज दि.४ ऑक्टोबर रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांची नांदेड येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले असून जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी लवकरच सोयाबीन खरेदी करण्यासाठी सोसायटीला परवानगी देणार असल्याची माहिती चेअरमन सुनील बेजगमवार यांनी दिली आहे.
कुंडलवाडी येथील सन १९५७ साली स्थापन झालेल्या कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र एकूण १८ गावाचे आहे. यापूर्वी सेवा सहकारी संस्थेअंतर्गत उडीद, चना, हरभरा खरेदी केलेली असून या खरेदी केंद्रा बाबतचा पूर्वानुभव सोसायटीस असून शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटीनुसार खरेदी होणार आहे. त्यामुळे सोसायटीस तातडीने खरेदी केंद्र सुरु करण्याची मान्यता द्यावी. अशी मागणी सोसायटीतर्फे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.