छत्रपती संभाजी नगरताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकीच्या कामात दांडी मारणाऱ्या व हलगर्जीपणा करणाऱ्या 155 कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद

प्रकाश महिपाळे

छत्रपती संभाजीनगर : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सुचनेला केराची टोपली दाखवून गैरहजर राहणाऱ्या 155 कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले असून. निवडणूक कामात हलगर्जीपणा करणाऱ्या सर्व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. एकाच वेळी 155 कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली असून यात फुलंब्री पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे.

छत्रपती संभाजी नगर मनपाच्या निवडणुकीसाठी फुलंब्री पंचायत समितीसह जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, मतदानाच्या दिवशी आणि त्यापूर्वीच्या साहित्य वाटपाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर हे 155 कर्मचारी गैरहजर असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

या कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे कर्तव्य बजावण्यासाठी वारंवार सुचना दिल्यानंतरही या कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त उदय दिगंबरराव मानवतकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. निवडणूक प्रक्रिया ही राष्ट्रीय कर्तव्याचा भाग असते. या प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होणे किंवा नियोजित मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध न होणे, हे संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम करू शकते.

त्यामुळेच, कामावर रुजू न होणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे स्पष्ट झाले. या फिर्यादीवरून लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करुन आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्यामुळे तब्बल 155 कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker