ताज्या बातम्याधर्माबादनांदेड

‘पावरफूल कपल’ धर्माबाद पालिकेत सत्तेच्या चाव्या पती-पत्नीकडे : घडला अनोखा इतिहास

प्रकाश महिपाळे

धर्माबाद : थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मराठवाडा जनहित पक्षाच्या सौ. संगिता बोलमवाड या निवडून आल्यानंतर धर्माबाद नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदी शंकर बोलमवाड यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे बोलमवाड पती-पत्नी या पावरफूल कपल ठरल्या असून. एकाच पालिकेत सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात ठेवण्याचा अनोखा इतिहास यांनी घडवला आहे.

राज्यात एकीकडे नेत्यांच्या घराणेशाहीची सर्वत्र चर्चा होत असताना नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपालिकेत मात्र अनोखी घटना घडली आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अगोदर पत्नी निवडून आली तर नंतर पती उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याने या ‘पावरफूल कपल’ची जिल्हाभर चर्चा होत आहे. धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. भाजपचे आ.राजेश पवार यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती आणि उमेदवार निवडीपासून ते प्रचार यंत्रणेत सुध्दा मनमानी व एकाधिकारशाही केली. त्यामुळे धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत सुप्रसिद्ध कंत्राटदार मोईज करखेलीकर यांनी आ. पवार यांची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी मराठवाडा जनहित पक्षाच्या माध्यमातून धर्माबाद नगर पालिकेच्या मैदानात उतरले.

मराठवाडा जनहित पक्षाकडून सौ. संगिता बोलमवाड यांना थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभ तर करण्यात आलेच पण पँनलही तयार करुन आ. राजेश पवारांच्या एकाधिकारशाहीला थेट आव्हान देण्यात आले होते. विशेष म्हणजे धर्माबाद शहरात आ.राजेश पवार यांच्या बद्दल कमालीचा रोष असल्याने मतदारांंनी भाजप आमदाराच्या एकाधिकारशाहीला जोरदार धक्का देत मराठवाडा जनहित पक्षाला भरघोस मतदान केल्याने नगराध्यक्षासह संपूर्ण पँनल बहूमताने निवडून आले. मिळालेल्या बहूमताने मतदारांनी एकाधिकारशाहीला जोरदार धक्का दिला असल्याने आमदारावर खरोखरच आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

सौ.संगिता बोलमवाड यांची थेट नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दि. 13 जानेवारी रोजी उपाध्यक्षपदाच्या निवडीत नगराध्यक्षा सौ.संगिता बोलमवाड यांचे पती शंकर बोलमवाड यांचीही बिनविरोध निवड झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासात पती आणि पत्नी एकाच वेळी धर्माबाद शहराच्या प्रथम व द्वितीय नागरिक म्हणून पदावर बसण्याणे दुर्मिळ आणि अनोखे उदाहरण ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker