गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

दिव्यांग व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिकमदत करून प्रभाकर पेंटेचा वाढदिवस साजरा

मोरे मनोहर

किनाळा :- विविध समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून सक्रिय कार्य करणारे आदमपूर तालुका बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पेंटे यांच्या पुढाकारातून मौजे केरूर तालुका बिलोली येथे मान्यवर मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग मेळावा आयोजित करुन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना साहित्य वाटप व आर्थिक मदत करुन अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

केरूर येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मेळाव्यात अनेक दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत व जीवनावश्यक साहित्य देऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला. कठीण परिस्थितीत असलेल्या कुटुंबांना समाजाचा आधार मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे याप्रसंगी प्रभाकर पेंटे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला बाळासाहेब पाटील खतगावकर, रवी पाटील खतगावकर, मैथीली कुलकर्णी माजी नगराध्यक्ष बिलोली, अंनुप अंकुंशकर उपनगराध्यक्ष, गिरीधर पाटील डाकोरे, भास्कर तरटे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली बालाजी सुगावे, चेअरमन सोसायटी भीमराव तरटे तंटामुक्ती अध्यक्ष सय्यद बाबा, शेख हमीद, सुभाष अमोघे हणमंत मुजळगे भगवान जाधव, शेख मोहम्मद उपसरपंच प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती तर या प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्ते असलेले प्रभाकर पेंटे यांच्या या सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित करत प्रभाकर पेंटे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना राजकीय क्षेत्रातील सर्व राजकीय नेत्यांनी प्रभाकर पेंटे यांच्या सामाजिक कार्य प्रमाणे प्रत्येकानी आपली भूमिका ठेवली पाहिजे असे मत व्यक्त केले.

प्रभाकर पेंटिंग यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे दिव्यांग बांधव व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर या मदतीमुळे समाधान दिसून आले असून त्यांच्या या सामाजिक कार्यातून समाजात माणुसकीचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker