ताज्या बातम्यानांदेडनायगांव

कुल्झर पलटी होवून धुप्पा येथील तरुणाचा जागीच मृत्यू पत्नी गंभीर तर अन्य जखमी

मोरे मनोहर

किनाळा :- नांदेड–नायगाव राज्य महामार्गावर वजिरगाव पाटी जवळ कुल्झर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात धुप्पा ता. नायगाव येथील तरुण युवक प्रल्हाद रामा भेदेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दि. १८ जानेवारी रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की धुप्पा ता.नायगाव व चिटमोगरा ता.बिलोली येथील एकूण अकरा जण नांदेड येथील कार्यक्रम आटोपून रात्री सुमारे दहा वाजता कुल्झर क्र. एमएच २६ ए.के. ०४२९ मधून शंकरनगरकडे निघाले होते. नायगाव तालुक्यातील वजिरगाव पाटीजवळ राज्य महामार्गावर सदर क्रुझर डिव्हायडरवर आदळून पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात प्रल्हाद रामा भेदेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी ज्योती प्रल्हाद भेदेकर यांच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर दुखापत झाली तर महानंदा यादव कांबळे, अरुणा हनमंत हनमंते, श्याम शंकर सोनकांबळे, शिल्पाबाई रंजीत भेदेकर, नागनाथ भेदेकर हे जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करून नांदेड येथील रुग्णालयात नेले असता येथील शासकीय रुग्णालयात प्रल्हाद भेदेकर यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी घोषित केले. या अपघातात त्यांची पत्नी ज्योती प्रल्हाद हे गंभीर जखमी असल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथील यशस्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अन्य जखमी रुग्णावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

प्रल्हाद भेदेकर यांचे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा सायंकाळी धुप्पा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. प्रल्हाद भेदेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई व वडील असा परिवार आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker