जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात दारू विक्री करणाऱ्या तीन विक्रेत्यांवर कुंटूर पोलिसांची कारवाई…
४८ देशी दारूच्या बाटल्या असे मिळून ३८४० रु चा मुद्देमाल जप्त

सिद्धार्थ गजभारे
कुंटुर :- नांदेड जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर कठोर कारवाईचा बडगा उगारत, कुंटूर पोलीस स्टेशनने आज एक महत्त्वपूर्ण कारवाई केली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत आरोपी १)गंगाधर सांगे वय ५८ वर्ष,२)जनार्दन झुंजारे वय ३० वर्ष व ३)बाबूमिया शेख वय ५६ या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला या दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील तब्बल ३हजार ८४० रुपये किमतीची देशी दारूच्या ४८ बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला.
कुंटुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या या कार्यवाहीने परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे. कुंटूर व कुंटूर परिसरामध्ये अवैध धंद्यांना उत आला असून त्यांना आळा घालण्याचे काम सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील भोसले हे करीत असल्याचे दिसत आहे.
या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग विशाल डी.भोसले (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन कुंटुर), जाधव साहेब (पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे.कुंटूर) पोकों स्वप्नील गोविंदराव हंबर्डे (पो.स्टे. कुंटूर) आणि अभिजीत पाटील यांचा समावेश होता.



