ताज्या बातम्यानांदेडबिलोली

जवाहर नवोदय विद्यालयात चोरीचा प्रकार घडल्याने विद्यार्थाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मोरे मनोहर

किनाळा :- प्रत्येक जिल्ह्यात एक असलेल्या शंकरनगर तालुका बिलोली येथील जवाहर नवोदय विद्यालयात अज्ञात चोरट्याने नवोदय विद्यालयातील रेस्ट हाऊसचे दार तोडून रेस्ट हाऊस मधील साहित्य आणि येथील एका महिला कर्मचाऱ्यांचे घर फोडून घरातील रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना दिनांक 31 जानेवारी रोजी उघडकीस आले असल्याने येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अधिक माहिती अशी की राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू करून या नवोदय विद्यालयात होतकरू व हुशार अशा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी हे विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत झाले पाहिजे यासाठी त्यांना सर्वतोपरी शासनाकडून मदत पुरवण्यात येत असते. जवाहर नवोदय विद्यालयाचा कारभार हा पारदर्शक चालला पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या नवोदय विद्यालयाची देखभाल केली जाते.

शंकरनगर तालुका बिलोली येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा कारभार रामभरोसे असून या विद्यालयास मुख्य प्रवेशद्वार आहे मात्र शाळेतील कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यीच्या असणाऱ्या निवासस्थानाच्या पाठिमागच्या बाजुने कंपाऊंड नसल्याने येथुन भर दिवसा अज्ञात अशा अनेक व्यक्तींचा नवोदय विद्यालयात अनेक वेळा सरास वावर असतो. येथे कंपाउंड नसल्याने याचा फायदा घेत काही मुख्य प्रवेशद्वारावरून न येता पाठीमागून नवोदय विद्यालयात प्रवेश करत असतात.

जवाहर नवोदय विद्यालयात अशाच पद्धतीने प्रवेश करून येथे असलेल्या रेस्ट हाऊसचे दार तोडून रेस्ट हाऊस मधील काही साहित्य चोरून नेले तर काही खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या नवोदय विद्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यांच्या घराचे दार तोडून त्यांच्या घरातून रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे दिनांक 31 जानेवारी रोजी उघडकीस आले असल्याने अनेकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी असलेली मुल व मुली हे येथेच निवासी असतात यामुळे अशा या निवासी असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या किंवा मुलींच्या वस्तीगृहात हे चोरटे घुसले असते तर मोठा अनुचित गैरप्रकार देखील घडू शकला असता सुदैवाने या विद्यालयातील मुला मुलींच्या वस्तीगृहाकडे हे चोरटे गेले नसल्याने मोठा अनर्थ टळला असून मुल व मुली यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवोदय विद्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

जवाहर नवोदय विद्यालयात चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर येथील प्राचार्य सुहास मंडले यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देण्यासाठी ज्या महिला कर्मचाऱ्यांचे घर फोडण्यात आले आहे त्यांना कल्पना दिली असून घडलेल्या या घटनेची पुणे कार्यालयास माहिती दिली असून त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल असे सांगितले.

नवोदय विद्यालयात रेस्ट हाऊस फोडून व घरात नसलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे घर फोडून घरातील काय काय साहित्य चोरीला गेले हे मात्र शाळेचे प्राचार्य व महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले नसल्याने अज्ञात चोरटे केंद्रीय विद्यालयात असलेल्या रेस्ट हाऊस मध्ये चोरी करून महिला कर्मचाऱ्यांचे घर फोडून फरार होण्यात यशस्वी झाल्याने येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्ना ऐरणीवर आला असून संबंधितांनी येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ नवोदय विद्यालयाची कंपाउंड व्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे असे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker