ताज्या बातम्यानांदेडनायगांव

धक्कादायक… देगलूर येथे कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्याची नायगावच्या कार्यालयात आत्महत्या

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : दोन महिण्यापुर्वी पदोन्नती झालेले कनिष्ठ अभियंता विलास बल्लूरे यांनी नायगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम उप विभागाच्या कार्यालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जानेवारी रोजी उघडकीस आली. कार्यालयातील पहील्या मजल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत काही नागरिकांनी पाहील्यानंतर नायगाव पोलिसांना ही माहिती देण्यात आली. आत्महत्येचे कारण समजले नसले तरी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नातेवाईकांनी प्रेत खाली उतरवू दिले नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

नायगाव शहरातील पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालय आहे. येथे कर्मचारी संख्या कमीच असल्याने दररोज एकदोन कर्मचारी किंवा साईडवर गेलेले अधिकारीच असतात. येथील कार्यालयात तांत्रिक अधिकारी नसल्याने देगलूर येथे कार्यरत असलेले सिव्हिल इंजिनिअर विलास बल्लूरे यांना प्रतिनियुक्तीवर नायगाव येथे काम करण्याचे आदेश मिळाले होते.

मागच्या दोन तीन वर्षांपासून ते नायगाव येथे कार्यरत होते. येथील कार्यालयाची चावी बल्लूरे यांच्याकडे असायची. काही दिवसापूर्वी त्यांची पदोन्नती झाली असल्यानं त्यांनी मुळ नियुक्ती असलेल्या देगलूर येथेच काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मागच्या दोन तीन महिण्यापासून ते देगलूर उपविभागात कार्यरत होते त्यांना काम करण्यासाठी एरिया ठरवून दिलेला होता.

असे असताना (दि.३१ ) जानेवारी रोजी सकाळी नायगाव येथील कार्यालयातील पहिल्या मजल्यावर त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळसळजनक घटना उघडकीस आली. शनिवार असल्याने कार्यालय बंद असल्याने फारसे कुणाचे लक्ष गेले नाही पण आजुबाजूला असणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने घटनेची माहिती सर्वत्र पसरली पोलीस यंत्रणेसह बघ्यांची संख्या प्रचंड झाली होती. मात्र गेटची चावी नसल्याने गटे उघडता आले नाही. गेटची यायला बराच वेळ गेला.

कारण शुक्रवारी कार्यालयात शिपाई होते त्यांनी कार्यालय बंद करुन गेल्यानंतर बल्लूरे यांनी कार्यालयात येवून गळफास घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नातेवाईक आल्यावर चावी आणली मात्र नातेवाईक आले त्यांनी गेट उघडू दिले नाही. पोलिसांनी गेट उघडण्याबाबत प्रयत्न केला पण कुटूंबासह अन्य नातेवाईकांनी कुलूप तर उघडू दिलेच नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत मयत विलास बल्लूरे यांच्या नातेवाईकांनी कार्यालयाचे गेट उघडू दिले नसल्याने बल्लूरे यांच्या आत्महत्येचे ठोस कारण समोर आले नाही. सायंकाळी सहा वाजता कुटूंबीय व नातेवाईकांच्या समोर प्रेत खाली काढून पुढील प्रक्रियेसाठी रुग्णालयात ठेवण्यात आले. कनिष्ठ अभियंता असलेले बल्लूरे यांची नियुक्ती देगलूर येथे असताना त्यांनी नायगाव येथील कार्यालयात येवून आत्महत्या का केली याबाबत गुढ वाढले आहे.

या घटनेवर नायगाव पोलीस ठाण्याचे बिट जमादार साईनाथ सांगवीकर लक्ष ठेवून असून. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसारच गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker