रस्त्यावर उभ्या असलेल्या वासराची कारमध्ये कोंबून केली चोरी : सी सी फुटेज समाजमाध्यमातून व्हारल

प्रकाश महिपाळे
नायगाव : मोकाट जणावरे चोरणारी टोळी नायगाव तालुक्यात सक्रिय असून. चार दिवसापूर्वी नरसी बिलोली रोडवर रस्ता दुभाजकावर एक गाय आणि तिचे वासरु उभे होते. पहाटे ५.२२ मिनिटाला अज्ञात चोरट्यांनी चक्क वासरु कारमध्ये कोंबून चोरी केल्याची घटना सी सी टी व्हि मध्ये कैद झाली. वासरु कारमध्ये कोंबतांना गाय व्याकूळ होवून कारच्या भोवताली फिरत होती पण चोरट्यांनी वासरु पळवल्याने गाय मात्र हतबल होवून पाहण्याच्या पुढे काही करु शकली नाही.
नायगाव तालुक्यात मोकाट जणावरे चोरी करणारी टोळी सक्रीय झाली असल्याने रस्त्यावर ठाण मांडणारे जणावरे गायब झालेले आहेत. गायब झालेले जणावरे मोकाट असल्याने याबाबत काहीही वाच्यता झाली नाही. मात्र चार दिवसापूर्वीची घटना सीसी टी व्हीत कैद झाल्याने याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून. गोरक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी रामतीर्थ पोलिसांना याबाबत चार दिवसात काहीही धागेदोरे सापडले नाहीत. या घटनेचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे फोन घेवून माहिती देण्याचेही औदार्य दाखवत नाहीत. त्यामुळे जणावरे चोरणाऱ्या टोळीला रामतीर्थ पोलीसांचेच अभय नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
आजपर्यंत घडलेल्या घटनेबाबत कुणीच तोंड उघडत नसले तरी चार दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचे व्हिडीओ फुटेज समाजमाध्यमातून पुढे आल्याने चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. बिलोली नरसी रोडवर दि. २५ जानेवारीच्या पहाटे एक गाय वासरु रस्ता दुभाजकावर उभे होते. पहाटे ५.२२ च्या सुमारास एक कार या गाय वासराजवळ येवून उभी राहते. या कारमधून तिघे खाली उतरतात व वासराला जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करतात. गाय सुरुवातीला हालचाल करते पण या चोरट्यांनी वासरु कारमध्ये कोंबल्यानंतर व्याकूळ होवून कारच्या भोवताली चकरा मारते पण चोरटे वासरु घरी वून पसार होतात. यावेळी गाय हतबल होवून पाहत राहते. एवढे व्हिडीओ फुटे व्हायरल झाले आहे.
या घटनेचे सी सी फुटेज समाजमाध्यमातून व्हायरल झाल्याने हळहळ तर व्यक्त करण्यात येतेच निर्दयी चोरट्यांनी अक्षरशः कारमध्ये वासरु कोंबून चोरी केल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.



