ताज्या बातम्यानांदेडबिलोली

शंकरनगर येथे अजितदादांच्या अस्थी कलशाचे अनेकांनी घेतले दर्शन

मोरे मनोहर

किनाळा :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थी कलशाचे दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शंकरनगर तालुका बिलोली येथे आगमन झाले असता अजित दादा पवार यांच्या अस्थी कलशाचे अनेकांनी दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केले.

अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले असल्याने त्यांच्या अंत्यविधीस सर्व सामान्य नागरिकांना जाणे शक्य नव्हते यामुळे सर्वांना अजित दादांच्या किमान अस्थीचे दर्शन घेता यावे यासाठी राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ.मीनल पाटील खतगावकर यांच्या पुढाकाराने दि.3 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शंकरनगर तालुका बिलोली येथे अजितदादा पवार यांचे अस्थीकलश आणले असता अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे अनेकांनी दर्शन घेतले.

शंकरनगर तालुका बिलोली येथे आणण्यात आलेल्या अजितदादा यांच्या अस्थिकलशयात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे , माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्षा डॉ.मिनल पाटील खतगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, प्राचार्य धनंजय शेळके,
माधवदादा वाघमारे, संतोष पाटील पुयड, आनंदराव बिरादार, हनमंतराव पाटील तोडे, रमेश शेटकर, मुरलीधर पाटील देगलुरे, सदाशिव पाटील डाकोरे, शेषेराव पाटील रोकडे, बाबाराव पाटील रोकडे, लक्ष्मण पाटील देगलुरे आदिसह कै.मधुकर पाटील खतगावकर महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी, श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य व शिक्षक तसेच भास्करराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल येथील सहशिक्षक व कर्मचारी आणि राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शंकरनगर येथे डॉ.मीनल पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शंकरनगर परिसरातील अजित दादावर प्रेम करणाऱी रामतीर्थ, किनाळा, हिप्परगामाळ, बिजूर, कामरसपल्ली, चिटमोगरा, धुप्पा, शेळगाव गौरी, टाकळी, जिगळा आदिसह अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादांच्या अस्थिकलशांचे दर्शन घेतले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळीच्या हस्ते दीप प्रज्वलित करून अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मंडळी स्वर्गीय अजितदादा पवार यांना एक मिनिटाची श्रद्धांजली अर्पण केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनल पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे आणि संतोष पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker