ताज्या बातम्यानांदेडबिलोली

बिलोली जुगार अड्ड्यावरील कारवाईचे कवित्व रंगू लागले : मुख्य सुत्रधाराला सोडल्याची जोरदार चर्चा

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी रोडवर प्रताप अंकुशकर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्यावर चोवीस तासातच कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाटलेल्या मोदकाचे काय असे असे बोलल्या जात असतांनाच जुगार अड्डा चालवणाऱ्या मुख्य सुत्रधाराला कुणाच्या दबावामुळे मोकाट सोडण्यात आले याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

बिलोली पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू सह अवैध धंद्यानी चांगलेच बाळसे धरत असताना स्थानिक गुन्हे शाखा मात्र बिलोली तालुक्यावर मेहरबान आहे. याचे कारणही तसेच आहे आणि ही बाब कुणापासूनही लपून राहीलेले नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे ‘बाँस’ हे बिलोलीचे भुमिपुत्र असल्यानेच कानाडोळा करण्यात येत आहे परंतु पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाची मात्र बारीक नजर असल्याचे या कारवाई वरुन दिसून आले.

शहाजी उमाप यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड पोहेकॉ/१७४२ खानसोळे,पोहेकों/२१५७ जिंकलवाड, पोअं/३०८२ धुमाळ व चालक पोअं/११७ गवळी असे यांनी बिलोली तालुक्यातील सावळी रोडवरील प्रताप अंकुशराव यांच्या शेतातील जुगार धाडसत्र राबवून मुख्य सुत्रधारासह जुगार खेळताना ताब्यात घेतलेल्या आरोपींना बिलोली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

शहाजी उमाप यांच्या पथकाने जुगार अड्डा सुरु झाल्याच्या चोवीस तासातच धमाकेदार कारवाई केल्याने ज्यांना मोदक देण्यात आले त्यांच्या नावाने बोंब उठली आहे. मोदक वाटल्यानंतरही कारवाई झाल्याने मोदक घेण्याऱ्यांची चांगलीच पंचायत झाली असून. या पथकाने पकडलेल्या जुगाऱ्यांना बिलोली पोलीसांच्या ताब्यात दिले.

पण या जुगार अड्याचा सुत्रधार एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याने रात्री उशिरा राजकीय सुत्र फिरले या जुगार प्रकरणात दुसऱ्यालाच सुत्रधार दाखवून मुख्य सुत्रधाराला पहाटेच्या दरम्यान घरी सोडण्यात आले असल्याची चर्चा बिलोली शहरात होत आहे.

पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्यावर कारवाई होईल?
लाचलुचपत सारख्या किंवा अशा हायप्रोफाईल जुगार अड्यावरील धाडसत्रानंतर त्या त्या ठाण्याच्या ठाणेदारावर कारवाई करण्यात येते. यापुर्वी अशा प्रकरणात संबधीत ठाणेदारास नियंत्रण कक्षात हलवण्यात आले होते. या प्रकरणातही वरिष्ठ अधिकारी बिलोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अतुल भोसले यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत त्यांना नियंत्रण कक्षात हलवतील काय अशी चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker