ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

रोहयो सामाजिक अंकेक्षण समितीची पडताळणी धाब्यावर ; अंकेक्षण समितीत रोहयो विभागाच्या मार्जितले व्यक्ती

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- सामाजिक अंकेक्षण समितीमध्ये प्रामुख्याने ज्या परिसरात काम सुरू आहे, त्या परिसरातील लाभार्थ्यांची निवड केली जाते. या समितीमध्ये ग्रामसभेतून निवडलेले नागरिक, रोहयो मजूर, स्थानिक गावकरी, आणि महिलांचा समावेश असतो, जे पारदर्शकतेसाठी काम करतात. ही समिती कामाच्या गुणवत्तेची, मजुरीची तपासणी करते. परंतु बिलोली तालुक्यात मात्र रोहयो विभागाच्या मार्जितल्या व्यक्तीची समिती निवड केली जाते. यामुळे झालेल्या कामाची पडताळणी धाब्यावर बसून करण्यात येते.

शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागातील रोजगाच्या हाताला काम मिळावे आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी रोहयोची मोहीम राबविली जाते. ही योजना राबण्यासाठी शासनाकडून करोडो रुपये खर्च करण्यात येत. या योजने अंतर्गत सामाजिक वृक्ष लागवड, वैयक्तिक फळबाग, सिंचन विहीर, शेततळे, सिसिटी, जणांवाराच्या गोठ्यासह विविध कामे केली जातात अशा कामावर तालुका स्तरावरील तहसीलदार, गटविकास अधिकारी व साह्यक कार्यक्रम अधिकारी यांचे नियंत्रण असते.

याबरोबर राबविण्यात येणाऱ्या कामांची पारदर्शकता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी गावपातळीवर ग्रामसभेत नियुक्त केलेली यंत्रणा म्हणजे ‘रोहयो अंकेक्षण समिती’ होय. या समितीद्वारे कामांच्या खर्चाचा हिशोब, प्रत्येक्षात काम करणाऱ्या मजुरांची हजेरी, साहित्याचा वापर आणि प्रत्यक्ष जाग्यावर कामाची पाहणी केली जाते. ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो. या समितीमध्ये प्रामुख्याने ज्या मजुरांनी काम केले आहे, त्यांचे प्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थांचा समावेश असतो, यात ग्रामसभेने निवडलेले गावातील ६ ते १० सदस्यांचे पथक असते.

ज्यांनी मागील आर्थिक वर्षात जॉब कार्डद्वारे मजुरी केली आहे, अशी व्यक्ती (विशेषतः महिला) आणि गावातील सामान्य नागरिक, ज्येष्ठ सदस्य यांचा समावेश असतो. ही समिती साधारणपणे दर सहा महिन्यांनी वर्षातून दोनदा ग्रामपंचायत स्तरावर होणे बंधनकारक आहे. हे समिती कामाच्या जायमोक्यावर जाऊन कामाची पडताळणी करून निधीचा वापर, खर्चाचे अहवाल ग्रामसभेत मांडणे.

व कामात अनियमितता, किंवा निधीत गैरव्याहावर झाला असेलतर संबंधितांवर कार्यवाहीची शिफारस करण्याचा अधिकार या समितीला आहे. परंतु बिलोली राहयो विभागाने आपले भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडूनये म्हणून ग्रामस्थांना विश्वासात न घेता आपल्या मार्जितल्या लोकांच्या पैसे उखळणाऱ्या बोगस समित्या परस्पर नेमून कामाच्या जायमोक्यावर न जाऊ देता धाब्यावर बसून कामाची पडताळणी केली जाते.

आणि या समितीच्या माध्येमातून लाभार्थ्याकडून लाखो रुपये उखळल्या जात आहेत. म्हणूनच तालुक्यात एवढा मोठा महाघोटाळा झाला असलातरी या समितीच्या निदर्शनास आला नाही. यामुळे अशा बेबणाव समितीच्या कार्याप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker