विद्यार्थ्यांनी परीक्षेची मनात भीती न बाळगता परीक्षा द्यावे- बाळासाहेब पाटील खतगावकर

मोरे मनोहर
किनाळा :- यंदा दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा कॉफी मुक्त घेण्यासाठी परीक्षा मंडळाकडून कडक व मोठे निर्णय घेतले जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या मनात ही परीक्षा कशी होईल अशी भीती निर्माण झालीआहे परंतु आपण वर्षभर अभ्यास केलेला असल्याने बोर्डाने कितीही कडक परीक्षा घेण्याचे ठरवले तरी तुम्ही चांगले गुण घेऊन यशस्वी पास होऊ शकता यासाठी कॉफी मुक्त वातावरणात परीक्षेची कसलीही भीती मनात न बाळगता येणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावे असे आव्हान बाळासाहेब पाटील खतगावकर यांनी केले.
शंकरनगर तालुका बिलोली येथील श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की शंकरनगर सारख्या ग्रामीण भागात आज मोठ्या प्रमाणात मुली शिक्षण घेत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान असून मुलींनी किमान पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्नाचा विचार न करता शिक्षण शिकावे असे आवाहन केले.
यावेळी श्री मधुकरराव पाटील खतगावकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करावे. त्यामुळे त्यांना अधिक फायदा होईल,” हे सांगताना डॉ.बक्षी यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्या संघर्षाचे उदाहरण देऊन सांगितले की, त्यांच्या आवडी आणि कौशल्यामुळे त्यांना कधीही त्यांच्या उद्दिष्टापासून विचलित होऊ दिले नाही याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठेवले पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.देगलूरकर यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती यांच्यात योग्य समन्वय राखण्याचा सल्ला दिला. तर साईंबाबा विद्यालयाचे प्राचार्य धनंजय शेळके यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले. यावेळी बारावी बोर्ड परीक्षेचे प्रमुख प्रा.किशन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कॉफी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोठे गुन्हे दाखल करा असे सांगितले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना कसलीही कॉफी सोबत आणू नये किंवा बाहेरून कॉफी देण्यासाठी कोणाला सोबतही आणू नये असे सांगितले.
याप्रसंगी दहावी व बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शिवाजी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै.मधुकर पाटील खतगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कोमल देगलूरे व राधा देगलूरे यांच्या स्वागत गीताने केले. यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पारते आणि ऋतुजा पांचाळ हिने केले तर उपस्थित आमचे आभार प्रा.हंबीरे यांनी मानले.



