ताज्या बातम्यानांदेडनायगांव

श्री.रोकडेश्वर यात्रा महोत्सव रातोळी येथे लोककला व लावणी महोत्सव उत्साहात संपन्न

लोकसंस्कृती, श्रद्धा व सामाजिक ऐक्याचा त्रिवेणी संगम

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- नायगाव तालुक्यातील ऐतिहासिक व पावनभूमी असलेल्या मन्याड नदी काठावरील मौजे – रातोळी येथील 166 वर्षाची परंपरा असलेल्या श्री.रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य लोककला व लावणी महोत्सव मंगळवार दि. 3 फेब्रुवारी रोजी भक्तिमय, उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. या महोत्सवाने संपूर्ण परिसर भक्तिमय व सांस्कृतिक आनंदाने भारावून गेला.

यात्रेनिमित्त सकाळपासुनच मंदिर परिसरात भाविकाची गर्दी दिसून येत होती. श्री.रोकडेश्वर देवाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यात्रेनिमित्त अखंड हरीनाम सप्ताह, पालखी व मिरवणूक, नयनरम्य आतिषबाजी, गणगवळण, भारूड व जंगी कुस्त्याचा फड यासह विविध धार्मिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.

यात्रेचे वैभव असलेला लोककला व लावणी महोत्सव सकाळी 11 वाजता सुरु करण्यात आला. या महोत्सवाने यात्रौत्सवाला सांस्कृतिक रंगत आणली. पारंपारिक लोककलेचे सादरीकरण, ठसकेबाज लावणी, पोवाडे, विविध लोकगीते सादर करण्यात आली. कलाकारांनी आपल्या दमदार अभिनय, नृत्याविष्कार व सादरीकरनातुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. लावणीच्या तालावर संपूर्ण परिसर टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला. महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाचा आनंद घेतला. या सांस्कृतीक पर्वाला रातोळी गावासह परिसरातील अनेक गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

यात्रौत्सवामुळे गावात आनंद, उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक श्रद्धेसोबतच लोकसंस्कृतीचे जतन आणि सामाजिक सलोखा जोपासण्याचे कार्य या महोत्सवातून घडल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. लोककला व लावणी महोत्सवात विजयी कलाकाराना ट्रॉफी, प्रणामपत्र व विशेष पारीतोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यात्रा कमिटी रातोळी व समस्त गावकरी मंडळी रातोळी यांच्या पुढाकारातून व सहकार्यातून यात्रा महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker