ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

हाय प्रोफाइल जुगार अड्याचे प्रकरण भोवले : बिलोलीचे पोलीस निरिक्षक अतुल भोसले तडकाफडकी नियंत्रण कक्षात

प्रकाश महिपाळे

नायगाव : बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावळी रोडवरील हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावरील कारवाई पोलीस निरिक्षक अतुल भोसले यांच्या अंगलट आली असून. जुगार अड्ड्याला जबाबदार धरुन भोसले यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात सलग्न केले आहे. बिलोली पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती कमल विश्वनाथ शिंदे यांचेकडे देण्यात आला आहे.

बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावळी रोडवर प्रताप अंकुशकर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्यावर दि. 3 फेब्रुवारी रोजी मा.पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या पथकाने जुगार आडयावर धाड मारुन सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला मोकाट सोडल्यानंतर कारवाईची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी रात्री नियंत्रण कक्षात सलग्न करण्याचे आदेश काढला.

सदरच्या आदेशात बिलोली ठाण्याच्या हद्दीत दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी क्लब परिसरात एका युवकाला गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली तर दि. 3 फेब्रुवारी रोजी मा.पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या पथकाने जुगार आडयावर धाड मारुन सुमारे 17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई केली आहे सदर बाब गंभीर आहे असे नमूद करतांनाच वरिष्ठ कार्यालयाने केलेल्या रेड बद्दलची माहिती आपण आम्हाला देणे अपेक्षित होते. तरी सुध्दा आपण आम्हाला त्याबाबत अवगत केलेले नाही.

तसेच बिलोली हद्दीत एकाच रात्री 06 दुकाणे फोडली, व्यापाऱ्यांनमध्ये भितीचे वातावरण या शिर्षकाखालील बातमी दि. 7 जानेवारी 2026 रोजी प्रसिध्द झाली होती. त्यामुळे जनमानसामध्ये पोलीसांच्या कामकाजाबद्दल चुकीचा संदेश गेलेला होता. आपणास वेळोवेळी हद्दीतील अवैध धंदयांविरुध्द कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटण करावे अशा सुचना देण्यात आलेल्या होत्या असे असतांनाही आपले पो. स्टे हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध जुगाराचे क्लब/अड्डे चालू असल्याचे दिसून आले असल्याचा उल्लेख केला आहे.

यावरुन आपले पो.स्टे.च्या कामकाजावर योग्य पर्यवेक्षण नसल्याचे व आपले पो.स्टे. हद्दीत अवैध धंदयांना आपली मुक संमती असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने आपणास तात्पुरत्या स्वरुपात पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथे सलग्न करण्यात येत आहे. अतुल एस. भोसले, पोलीस निरीक्षक, पो.स्टे.बिलोली यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड येथे हजर होवून अनुपालन सादर करावा. असे आदेश तर दिले आहेतच पण बिलोली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती कमल विश्वनाथ शिंदे यांनी अतुल एस. भोसले, पोलीस निरीक्षक, पो.स्टे.बिलोली यांचेकडून तात्पुरत्या स्वरुपात पदभार स्विकारुन अनुपालन अहवाल सादर करावा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

बिलोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करुन जिल्ह्यातील इतर ठाणेदारांना एक प्रकारे इशाराच दिला आहे. सावळी रोडवरील हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावरील कारवाई संदर्भात न्यु भारत टाईम्स या पोर्टलने वस्तुनिष्ठ बातम्या प्रकाशित करुन पोलीस विभागाच्या नाकाखाली सुरु असलेल्या अवैध धंद्याची पोलखोल केली होती. त्यामुळे बिलोली परिसरात न्यु भारत टाईम्सचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker