वासरु चोरी प्रकरणातील आरोपी पकडले एलसीबीने, पाठ थोपटून घेत आहेत रामतीर्थ पोलीस

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : गो तस्करांनी नरसी बिलोली रोडवर उभ्या असलेल्या वासराला कारमध्ये कोंबून चोरी केल्याच्या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर सर्वच स्तरातून टिकेची झोड उठली होती. नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले मात्र या प्रकरणातील आरोपी पकडले स्थानिक गुन्हे शाखेने. यानंतर रामतीर्थ पोलीसांच्या कार्यक्षमतेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे रामतीर्थ पोलिसांनी संयुक्त तपास करण्यात आला होता असे सांगत पाठ थोपटून घेत असल्याने त्यांचे चांगलेच हसे होत आहे.

बिलोली नरसी रोडवर दि. २५ जानेवारीच्या पहाटे एक गाय वासरु रस्ता दुभाजकावर उभे होते. पहाटे ५.२२ च्या सुमारास एक कार या गाय वासराजवळ येवून उभी राहते. या कारमधून तिघे खाली उतरतात व वासराला जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करतात. गाय सुरुवातीला हालचाल करते पण या चोरट्यांनी वासरु कारमध्ये कोंबल्यानंतर व्याकूळ होवून कारच्या भोवताली चकरा मारते मात्र चोरटे वासरु घेवून पसार होतात. यावेळी गाय हतबल होवून पाहत राहते एवढे व्हिडीओ फुटे व्हायरल झाले आहे. त्यानंतर रामतीर्थ पोलीस केवळ थातूरमातूर चौकशी करुन प्रकरण थंड बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता.
सदर घटना सोशल मीडिया वरून व्हायरल होताच बजरंग दलाचे कार्यकर्ते पांडुरंग खानपट्टे कैलास बनकर नागेश मोर्चे प्रवीण भाऊ पाळेकर दीपक भाऊ तळणीकर सतीश आदींने गाईच्या वासराची क्रूरपणे कार मध्ये वाहतूक करणारे आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लावून धरली होती तर सर्वसामान्य नागरिकही रामतीर्थ पोलीसांच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता. सर्वच स्तरातून टिकेची झोड उठली आणि नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागल्यानंतर रामतीर्थ पोलीसांना तर जाग आलीच नाही पण स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या व रामतीर्थ पोलीसांच्या स्वाधीन केले.
वासरु चोरीच्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अजीम मोहम्मद सिराज राहणार नांदेड, शेख आश्रम पिताशकेल राहणार मनोर तालुका जिल्हा पालघर मनोर तालुका जिल्हा पालघर व आयुब खान राहणार मुंब्रा जिल्हा ठाणे यांना रामतीर्थ पोलीसांनी पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले असून वासराला चोरून नेण्यासाठी वापरण्यात आलेली कार क्रमांक एम एच ४६, पी ८४८१ जप्त केली आहे.



