ताज्या बातम्यानांदेडबिलोली

शिक्षकाची समाजातील भूमिका अत्यंत महत्त्वाची- आमदार अंतापूरकर

मोरे मनोहर

किनाळा :- जसे शेतकरी वर्षभरासाठी शेतात बी पेरणी करतो, तसे शिक्षक पिढ्यांसाठी करतो म्हणून शिक्षकाची समाजातील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत बिलोली-देगलुर मतदार संघाचे आमदार जीतेश अंतापूरकर यांनी व्यक्त केले. शंकरनगर येथील साईबाबा हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले माणिकराव हळदे यांच्या निवृत्ती समारंभात ते बोलत होते.

साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब पाटील खतगावकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी श्री मधुकरराव बापुराव पाटील खातगावकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव पाटोदे, श्री भास्करराव पाटील खातगावकर पब्लिक स्कूलचे प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, माणिकराव हळदे, श्रीमती ललिताबाई हळदे, रामतीर्थ येथील सरपंच प्रतिनिधी हनमंतराव तोडे, संतोष पुय्यड, लक्ष्मीकांत कांबळे, बाबाराव रोकडे, किनाळचे सरपंच विठ्ठल माने, आर.बी. जाधव, लक्ष्मण पाटील देगलुरे हे व्यासपीठावर उपस्थिती होते.

डॉ.किशन गायकवाड यांनी स्वागतपर आपले मनोगत व्यक्त केले. कोमल देगलुरे व राधिका देगलुरे यांनी स्वागतगीतानी पाहुण्यांचे स्वागत केले याप्रसंगी संस्थेच्या वतीने शिक्षक माणिक हळदे व श्रीमती ललिताबाई हळदे यांचे भव्य स्वागत करण्याआले. मंगल वाघमारे, संतोष भक्तापुरे, छाया पाटील, उमाकांत शेटकर, शिवाजी पाटील, प्राचार्य शिवाजीराव पाटोदे, जी.व्ही.पांचाळ, प्राचार्य पांडे, आर.बी.जाधव यांनी या प्रसंगी आपले विचार मांडले.

शाळेचे मुख्याध्यापक धनंजय शेळके यांनी आपल्या भाषणात माणिक हळदे यांच्या समर्पित कार्याची प्रशंसा केली व निवृत्तीनंतर स्वस्थ जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. माणिक हळदे यांनी उत्तरादाखल आपल्या मनोगतात व्यवस्थापनाचे आभार मानले व दिवंगत मधुकरराव पाटील खातगावकर यांच्या विचारांच्या वारशाची प्रशंसा करून भास्करराव पाटील व डॉ. मिनल पाटील खातगावकर यांच्या औदार्याचीही त्यांनी प्रशंसा करताना दादांनी शाळेत माझ्यासारख्या सामान्य शिक्षकांना विद्यार्थी घडवण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मी शतशः ऋणी राहीन असे सांगितले.

यावेळी बाळासाहेब पाटील खतगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांना मनमुराद हसवून सोडले व माणिक हळदे यांच्या समर्पित कार्याची दाद दिली. अविनाश शिंगारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर ज्योती व्हनशेट्टे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker