ताज्या बातम्यानांदेडबिलोली

शिवनेरी पोद्दार लर्निंग स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे

मोरे मनोहर

किनाळा :- बिजुर तालुका बिलोली येथील शिवनेरी पोद्दार लर्निंग स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कला, नृत्य, गायन व नाट्य सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणातून शिक्षकांनी मुलांवर घेतलेली मेहनत आणि तितक्याच तन्मयतेने विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आणि रियाज याचा प्रत्यय सर्वांना आला.

या कार्यक्रमामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यातील स्नेह अधिक दृढ झाला अशी पोचपावती उपस्थित असलेल्या पालकांनी दिली. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली न्यायालयाच्या न्यायाधीश अस्मा जावधवार मॅडम होत्या.

यावेळी व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर जाधव, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि विक्रम हराळे, हणमंत पा सुलतानपुरकर, पिआय जगदीश भंडरवाड,सुभाष पा कल्याण, सोपानराव जाधव, आनंदराव शिपाळे, केवळबाई जाधव, डॉ स्वरुपा जाधव, सुनंदा भंडरवाड, कविता जाधव, स्वामी, बालाजी पाचांळ सह आदी अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवनेरी पोद्दार लर्निंग स्कूल बिजुर येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई पॅटर्ननुसार आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या उपक्रमाचे कौतुक न्यायाधीश अस्मा जावधवार मॅडम यांनी करून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिेले.

यावेळी पोद्दार लर्निंग स्कूल चे संचालक डॉ. शिवाजी स्वामी यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की विद्यालय अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कला गुनाना वाव मिळावा म्हणून असे अनेक कार्यक्रम राबवुन विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न झाला पाहिजे यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू असून विद्यालयातील विविध विभागांनी केलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा सादर करून विद्यालयीन विकासाचा आलेख मांडले.

याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. ज्ञानेश्वर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आम्ही सर्व वैद्यकीय क्षेत्रात व विविध उच्च पदावर कार्य करणारी मंडळी एकत्र येऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सीबीएससी पॅटर्न चे शिक्षण मिळाले पाहिजे हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून या माळरानावर या शाळेची मुहूर्तमेढ रोवली असून हा आज इवले रोपट असलेला येणाऱ्या काळात वटवृक्ष होण्यासाठी परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठवावे असे आव्हान केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवर मंडळींचे संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले यावेळी
प्रतिष्ठित नागरीक, शंकरनगर परिसरातील पत्रकार, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य नितीन आलियास यांनी केले तर आभार डॉ.ज्ञानेश्वर जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker