किनाळा येथे शिवजयंती निमित्त चिमुकल्यांचा कलाविष्कार विविधगुणदर्शनास मोठा प्रतिसाद

मोरे मनोहर
किनाळा :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किनाळा तालुका बिलोली येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता चिमुकल्या बालकांचा कलाविष्कार हा विविध कलादर्शनाचा सिधी MPSC Institute, नायगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास गावातील नागरिकाकडून मोठा प्रतिसाद देण्यात आला.

शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने गावचे भूमिपुत्र भानुदास पुंडलिकराव भोसले यांनी पुढाकार घेऊन आपल्या क्लास मध्ये जे चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांच्य सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे नृत्य, नाटक, भाषण, गीतगायन व इतर सांस्कृतिक सादरीकरण केले.
शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा आदर केला जात होता मात्र आजची स्त्री सुरक्षित आहे का , मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम, मा जिजाऊ चे शिवबाला घडवण्यासाठी केलेले कष्ट हे आजच्या तरुण पिढीने आपल्या डोळ्यासमोर ठेवून शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या नियमानुसार आपण आपल्या जीवनात त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असा संदेश देणाऱ्या अनेक लघु नाटिका चिमुकल्याणी सादर केले तर शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर अनेक चिमुकल्याणी आपल्या मनोगत आतून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केले.
अनेक विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिवाजी महाराजांचा पोवाडा हा उपस्थित सर्व प्रेक्षकांना मंत्रमुक्त करणारा ठरला तर शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विविध गाण्यासह अनेक मराठमोळ्या लावण्यांचा कलाविष्कार सादर केले या कार्यक्रमास गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भानुदास पाटील भोसले यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या चिमुकल्या बालकलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच विठ्ठल माने, उपसरपंच बालाजी पाटील भोसले, चेअरमन गोविंदराव पाटील भोसले, व्यंकटराव पाटील शेळगावे, रावसाहेब पाटील मोहिते, राजू पाटील भोसले, पत्रकार यशवंत मोरे, बाबू माने, प्रताप पाटील मोहिते, भत्ते, पुंडलिक पाटील भोसले आधी सह गावातील मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मा जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नागेश पाटील मोहिते आणि सुरेश पाटील माने यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिधी MPSC Institute, नायगाव येथील भानुदास पुंडलिकराव पाटील भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना भानुदास पाटील भोसले यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही यासाठी गावातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षण शिकवावे अशी विनंती केले.



