ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मांजरममध्ये वयोवृद्धासह कर्करोगग्रस्त व जनतेच्या आरोग्य तपासणीला मोठा प्रतिसाद !

उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या निधनामूळे अभिष्टचिंतन टाळले ; राष्ट्रवादीच्या पांडुरंग शिंदेंची जन्मदिनी सामाजिक बांधिलकी

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- वयोवृद्धासह कर्करोगग्रस्त व जनतेच्या आरोग्य तपासणी शिबीरात मांजरममध्ये परिसरातील जनतेने चांगलाच प्रतिसाद दिला. निमित्त होते, राज्याचे उपमूख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच निधन झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवणारे,शेतकरी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आपल्या जन्मदिनी अभिष्टचिंतन टाळून सामाजिक बांधिलकी जोपासीत घेतलेल्या आरोग्य शिबीराचे. सामाजिक जाणिवेतून घेतलेल्या या त्यांच्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक होत आहे.

अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे पांडुरंग शिंदे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांतून साजरा केला जातो. परंतू कांही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने त्यांनी स्वतःचा अभिष्टचिंतन सोहळा टाळून मांजरम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि कर्करोग तपासणी व जनआरोग्य शिबिराचे आयोजन करून सामाजिक जाणीव ठेवित अत्यंत साध्या पद्धतीने लोकांच्या समवेत व लोकसेवा करत वाढदिवस साजरा केला.

या मोफत आरोग्य शिबिरामध्ये मांजरम व पंचक्रोशीतील जवळपास ५०० हून अधिक विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांनी लाभ घेत आपली तपासणी करून घेतली. त्यातील मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी उदगीर येथील लायन्स नेत्र रुग्णालय येथे गाडीमध्ये पाठवण्यात आले आणि कॅन्सर ग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले.

यावेळी मोतीबिंदू व नेत्र तपासणी उदगीर येथील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्करोगग्रस्तांची तसेच, अन्य आजारी रुग्णांचीही तपासणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तज्ञांनी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरमच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनमकर मॅडम, तालुका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.किलारे, आरोग्य सहाय्यक राठोड, आरोग्य सहाय्यिका गायकवाड मॅडम आणि सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका ए.एन.एम व जी.एन. एम, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांनी सहभाग नोंदवून आरोग्य शिबीर यशस्वी केले.

यावेळी भगवानराव काका शिंदे,लक्ष्मण भवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकते, धर्माबाद तालुकाध्यक्ष दिलीप पाटील चिकनेकर, नायगाव तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, संभाजी पा.ताटे, विश्वंभर कदम, बालासाहेब माली पाटील (तात्या), पत्रकार शिवाजी शिंदे, पंडित शिंदे, विश्वनाथ शिंदे आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker