ताज्या बातम्यानांदेडबिलोली

वार्षिक तपासणी निमित्त नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची कुंडलवाडी पोलीस ठाण्यास भेट

कुंडलवाडी :- येथील पोलीस ठाण्याला नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी वार्षिक तपासणी निमित्त दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता भेट देऊन कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील कामगिरीचा आढावा घेतला.

यावेळी कुंडलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांना पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच श्री भक्ती गणेश मंडळाचा महाराष्ट्र शासनाकडून गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आल्याने त्यांचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार व ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

तसेच जुने पोलीस ठाणे येथे पोलीस चौकी उभारण्याबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शहरात निवासस्थान उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यावेळी सांगितले. यानंतर पोलीस ठाण्यातील गुन्हे निर्गती, गुन्ह्यांचे रेकॉर्ड, पोलीस ठाणे परिसरातील स्वच्छतेची पाहणी तसेच ठाण्यातील कामगिरीचा बारकाईने आढावा घेऊन समाधान व्यक्त केले

यावेळी नांदेड चे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील उपस्थित होते. वार्षिक तपासणी यशस्वी पार पाडण्यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे साहित्य पोलीस निरीक्षण ज्ञानेश्वर शिंदे, गजेंद्र मांजरमकर व संपूर्ण पोलीस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker