ताज्या बातम्यानांदेडनायगांव

छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

नायगाव महसूल विभागाचा पुढाकार 7 मार्च रोजी कुंटूर येथे पार पडणार अभियान

अंकुशकुमार देगांवकर

नायगाव :- नागरिकांना महसूल विभागातील सेवा सुलभरीतीने मिळाव्या तसेच तात्काळ सुविधा देऊन नागरिकांची हेलपाटे थांबवावी यां उद्दात भावनेने महसूल विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे घेण्याचे नियोजन केले आहे.

या अभियानाअंतर्गत महसूल विभागांमार्फत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानामुळे प्रलंबित असलेले फेरफार निकाली निघणार आहेत, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायदा तात्काळ सेवा, अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणा बाबत मार्गदर्शन करणे आदी सेवा देण्यात येणार असल्याची माहिती कुंटूर मंडळ अधिकारी आर.के.पवार यांनी दिली.

यां अभियानासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी बिलोली क्रांती डोंबे, तहसीलदार डी.अनन्या रेड्डी आदी अधिकाऱ्याचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे अभियान जिल्हा परिषद हायस्कुल कुंटूर येथे 7 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता पार पडणार आहे. परिसरातील नागरिकांणी यां अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कुंटूर मंडळाचे मंडळ अधिकारी आर.के.पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker