ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

बार्टी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार – महासंचालक सुनील वारे

बार्टी करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअरला हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती

जयवर्धन भोसीकर

नांदेड :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्यावतीने आज नांदेडमध्ये अनुसूचित जातीच्या युवक- युवतींसाठी ‘बार्टी करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअरचे आयोजन करण्यात आले होते. या फेअरला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यातल्या विविध जिल्ह्यातून तसेच शेजारील आंध्र प्रदेशातूनही काही विद्यार्थी या फेअरमध्ये सहभागी झाले होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्षावर मात करून विदेशात उच्च शिक्षण घेतले. त्यांचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षण घ्यावे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टी करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअरच्या माध्यमातून आखाती देशात रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे महासंचालक सुनील वारे म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संस्थेच्य वतीने दिनांक शंकराव चव्हाण सभागृह नांदेड येथे बार्टी करिअर अँड एम्प्लॉयमेंट मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर बार्टीचे विभागप्रमुख डॉ.बबन जोगदंड, प्रेरणा कन्सलटन्सीचे अध्यक्ष प्रकाश बोडके, जनरल मॅनेजर फयाद गोली, रवींद्र दरेकर, लाॅ कालचे प्राचार्य एम.बी.अल्ली, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक महेश प्रकल्प अधिकारी मनोज खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी या मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ जोगदंड यांनी केले. ते म्हणाले की, मराठवाड्यातील मुलांना आखाती राष्ट्रात रोजगारांच्या मोठ्या संधी असून बार्टीने पहिला प्रयोग नांदेडमध्ये केला असून या पायलट प्रोजेक्टला मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाचा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहान केले.

निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी बार्टीच्या विद्यार्थ्यांना प्रदेशात जाण्यासाठी काही मदत लागली तर जिल्हा प्रशासन सर्व मदत करेल असे सांगितले प्रेरणा कन्सलटन्सीचे अध्यक्ष बोडखे यांनीही विद्यार्थ्यांना विदेशी नोकरीची प्रक्रिया समजून सांगितली. यावेळी रवींद्र दरेकर, आणि फैयाद गोली यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रकल्प अधिकारी मनोज खंदारे, मुंजाजी कांबळे, रामदास लोखंडे, यांच्यासह बार्टीचे समतादूत यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन अविनाश नाईक व सोनू दरेगावकर यांनी केले आभार महेश गवई यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker