गुप्तधनाच्या शोधत आलेल्या 7 जनांच्या टोळीस नायगाव पोलिसांनी केले अटक

प्रकाश महिपाळे
नायगाव : तालुक्यातील गडगा शिवारातील महादेव मंदिराच्या जवळ गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करणार सात जणांच्या टोळीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुजेच्या साहीत्यासह एक फावडा, एक प्लास्टीकची बॉटल, एक पांढऱ्या रंगाचे कापड व ईर्टीगा कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागे-दोरे शोधून काढण्यासाठी नायगाव पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.
नायगाव तालुक्यातील गडगा शिवारातील वाडीचे महादेव मंदीर परिसरात गुप्तधन काढण्यासाठी काही लोक जमले असल्याची गोपणीय माहीती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी पोउपनि श्री.जी.व्ही.तोटेवाड, पोलीस अमलदार बालाजी शिंदे, संजय चरकुलवार, ज्ञानेश्वर पुणेबोईनवाड, होमगार्ड दासरवाड, भालेराव यांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता.
काही लोक पुजा-अर्चना व गुप्तधन काढण्याची विधी करुन खड्डा खोदत असताना मिळुन आले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यानी त्यांचे नाव १) परमेश्वर देविदास दांडेकर २) माधव रामराव सुर्यवंशी ३) लक्ष्मीबाई रामराव सुर्यवंशी तिघे रा.बिजुर ता.भैसा जि.निर्मल (तेलंगाणा) ४) व्यंकट माधवराव हुस्से रा.वळंकी ता.मुखेड ह.मु.हेडगेवार चौक नायगाव ५) दिलीप भानुदास डोईवाड ६) मधुकर जळबा बोयनर रा.कोपरा ता.नायगाव ७) विशाल बालाजी शिंदे रा.देगाव ता.भैसा जि.निर्मल (तेलंगाणा) असे असल्याचे सांगितले. त्यांना विचारपुस केली असता त्यानी गुप्तधन काढण्यासाठी जमल्याचे सांगितले.
कथित गुप्तधन काढण्यासाठी आलेल्या वरील सातही आरोपींना नायगाव पोलिसांनी ताब्यात घेवून सदर ठिकाणाहुन एक फावडा, एक प्लास्टीकची बॉटल, एक पांढऱ्या रंगाचे कापड व ईर्टीगा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
करुन त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या विरोधात बालाजी बळवंतराव शिंदे यांच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात कलम 3 महाराष्ट्र नरबळी ईतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्या बाबत व त्याचे समुळ उच्चाटाण करण्याबाबत अधिनियम-२०१३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस उप निरिक्षक गजानन तोटेवाड हे करीत आहेत.



