ताज्या बातम्यानांदेडबिलोली

रामतीर्थ येथील रुग्णालयात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

मोरे मनोहर

किनाळा :- भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे वंचित बहुजन आघाडी बिलोली तालुका कोषाध्यक्ष गंगाधर कांबळे तथा पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली रामतीर्थ येथील प्राथमिक रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे कधीच कुणापुढे झुकले नाही आणि कधी झुकणारही नाही या तत्त्वावर बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वाटचाल असल्याने बाळासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानणारा बहुजन वर्ग असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे वंचित बहुजन आघाडी बिलोली तालुका कोषाध्यक्ष गंगाधर कांबळे यांच्या वतीने रामतीर्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी, शाहीर दिपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद कांबळे, धम्मानंद कांबळे मुगावकर, पत्रकार धमानंद भेदेकर, कुडके आधी सह वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker