विद्यार्थ्यांवर लाठी, विरोधकांवर दडपशाही ; नायगावात काँग्रेसचा संताप, रास्ता रोको करुन केंद्र सरकारचा निषेध

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : दिल्लीतील जंतर-मंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित अमानुष लाठीचार्जाच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झालेल्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नायगाव येथे तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारवर लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली.

विद्यार्थ्यांच्या आवाजाला लाठीच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न हा संविधान, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट हल्ला असल्याची टीका यावेळी करण्यात आली. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे अत्यंत निषेधार्ह असून, विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही पोलिसी कारवाईचा सामना करावा लागत असल्याने केंद्र सरकार हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र आंदोलनकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने निषेध नोंदवत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, लाठीचार्जाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि अशा प्रकारच्या दडपशाहीला तात्काळ आळा घालावा, अशी मागणी केली. “विद्यार्थ्यांचा आवाज दाबून देश चालत नाही, तर त्यांच्या प्रश्नांना न्याय देऊनच लोकशाही मजबूत होते,” असा संदेश देत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, श्रीकांत पाटील चव्हाण, अजित पाटील चव्हाण, नगराध्यक्ष संजय पाटील चव्हाण, तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाधर पाटील बेलकर, माजी नगराध्यक्ष नारायण पाटील जाधव, शहराध्यक्ष पांडू पाटील चव्हाण, युवक काँग्रेस अध्यक्ष माणिक चव्हाण, नगरसेवक शरद भालेराव, नगरसेवक सतीश लोकमनवार, रवींद्र भालेराव, विजय भालेराव, नारायण मदेवाड, नगरसेवक गणेश नायगावकर साईनाथ चन्नावार, नगरसेवक विठ्ठल बेळगे.
हनमंत पाटील शिंदे संदीप रातोळीकर, संभाजी पाटील मारवाळीकर, विलास पाटील गाडगेकर, संभाजी शिंदे अंतरगावकर, अभिजीत मंगरुळे, माधवराव धर्माधिकारी, सतीश हनमंते, शिवराज वरवटे, दत्तात्रय आईलवार, किरण कदम, शंकर चव्हाण, सुरज बेळगे, विश्वनाथ तमलूरे हनमंत श्रीराम पाटील पवळे पांडुरंग पाटील चव्हाण (पिके) अविनाश पाटील चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



